Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
लॉकडाउन काळात दैठण्याचे सरपंच छत्रुघ्न कणसे यांच्या पुढाकाराने राबवले अनेक उपक्रम
लॉकडाउन काळात दैठण्याचे सरपंच छत्रुघ्न कणसे यांच्या पुढाकाराने राबवले अनेक उपक्रम
स्वच्छता - फवारणी – मास्क – सेनिटाझर, अन्नधान्य किराणा मोफत वाटप
परतूर प्रतिनिधी:सर्वसाधारण परिस्थिती असतांना केवळ सामाजिक भावना व जागरूकता करून अडचणीच्या काळात माणुसकीचे दर्शन घडवून आणत तालुक्यातील दैठणा बुद्रुकचे सरपंच शत्रूघ्न कणसे यांनी लॉकडाउनच्या काळात आपल्या गावात स्वच्छता, फवारणी, मास्क, सेनिटायझर, अन्नधान्य व किराणा मोफत वाटपासह अनेक उपक्रम राबवत कोरोना संसर्ग होऊ नये यावर अजारावर मात करण्यासाठी नागरीकांच्या सुरक्षेसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. आरोग्य विभागामार्फत जनजागृती करण्यासाठी गावात जनजागृती पथकाचा दौरा आयोजित केला. परिसरातील इतर लोकप्रतिनीधीनी देखील असाच पुढाकार घेऊन आदर्श घेण्याची गरजेचे असल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गावाच्या नागरिकांच्या सुरक्षा करण्यासाठी सर्व प्रथम गावाच्या सीमा बंदीचा सर्वप्रथम निर्णय :
२१ मार्चला लॉक डाऊनची घोषणा होताच सर्व प्रथम सरपंच कणसे यांनी तातडीने आपल्या गावाकडे येणारे रस्ते सील केले. विनाकारण बाहेरच्या लोकांना गावात येण्यास, गावातील नागरीकांना विनाकारण गावाबाहेर जाण्यास बंदी केली. यामुळे या गावातील लोकांचे आरोग्य अबाधित राहिले.
महिनाभरापासून मोफत फिल्टर पाणी पुरवठा :
लॉक डाऊन मुळे गावातील सर्व लोकांना शुद्ध पाणी पुरवठा केला जावा. अशुद्ध पाण्यामुळे पसरणारे आजार बळावू नये म्हणून संपूर्ण गावाला मोफत फिल्टर पाण्याचा पुरवठा त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत सुरु आहे.
संपूर्ण गावात स्वच्छता अभियान व सॅनिटायझर फवारणी :
गेल्या एक महिन्या पासुन गावातील नागरीकांना सतर्क करत आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश देत संरपंच कणसे यांनी गावातील प्रत्येक भागात सॅनिटायझरची फवारणी सूरू केली आहे. दर दोनतीन दिवसाला ही फवारणी नियमित केली जाते. वैयक्तिक स्वच्छतेसाठी सॅनिटायझरच्या बाटल्या आणि मास्कचे घरोघरी मोफत वाटप केले.
गावातील मजुरांना मदतीचा हात :
गेल्या महिन्यापासुन लॉक डाऊन मध्ये अडकेल्या मजुरांना दिलासा देण्यासाठी अन्न धान्याची मदत पुरवली. यामुळे मजुरांवर आलेली उपासमारीची वेळ टळली आहे.
केलेल्या मदत कार्याची प्रसिद्धी नको, मात्र यातुन इतरांना प्ररणा मिळते :
या संकटाच्या काळात प्रसिध्दी साठी मदत करणे चुकीचे आहे. मात्र समाज अनुकरशील आहे. आपण केलेली मदत जेव्हा इतरांना माहिती होईल तेव्हाच त्यांच्या मनात मदत करण्याची भावना जागृत होईल. केलेल्या मदतची प्रसिद्धी नको मात्र यातून इतरांना यातून प्रेरणा घेऊन अडचणीतील नागरिकांना मदत होत असते असे मत सरपंच शत्रुघ्न कणसे यांनी यावेळी व्यक्त केले.
चौकट
पिंप्रूळा गावातील अपंग दांपत्याच्या घराला लागलेल्या आगीत त्यांचा संपूर्ण संसारसह त्यात घरातील वर्षभर कबाड़ कष्ट करुन पिकवलेले कापुस, तुर, सोयाबीन तसच शेतीची अवजारे पंप स्कुटी सर्व घरातील जीवनावश्यक साहीत्य, सर्व घरसंसार आगीत जळून खाक झाल. आधिच असलेलं लाँकडाऊन व आग्नितांडव आशा दुहेरी संकटात हे कुटुंब सापडले आहे. माणुसकीच्या नात्याने आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने या परिवाराला पन्नास किलो गहू, तांदूळ दहा कि. पाच किलो तेल पाच किलो साखर चहापत्ती,शेंगदाने 5, चटणी, मसाला, हळदी, मिठ, साबण, सेनेटाइजर,मास्क आदी जिवनोपयोगी साहीत्य दोन महिने पुरेल इतके दिल आहे. हे परिवार कुटंब अपंग असाह्य आहे. आणि झालेलं नुकसान प्रचंड आहे. समाजातून खुप मदतीची गरज या कुटुंबाला आहे. दानशूर व्यक्तीने समोर येऊन जमेल तशी मदत या शेतकरी कुटुंबाला परत उभा राहण्यासाठी गरज आहे. शत्रुघ्न सदाशिवराव कणसे सरपंच, दैठणा (बु.)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा