Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १९ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
अमळनेर येथे लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर गोर गरीब लोकांना जेवण देण्यासाठी गोक्षेत्र प्रतिष्ठाण सोबत डॉ अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाउंडेशन ने पुढाकार घेत एक दिवसाचे अन्नदान केले.
अमळनेर येथे लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर गोर गरीब लोकांना जेवण देण्यासाठी गोक्षेत्र प्रतिष्ठाण सोबत डॉ अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाउंडेशन ने पुढाकार घेत एक दिवसाचे अन्नदान केले.
अमळनेर प्रतिनिधी लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर गोर गरीब लोकांना जेवण देण्यासाठी गोक्षेत्र प्रतिष्ठाण सोबत डॉ अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाउंडेशन ने पुढाकार घेत एक दिवसाचे अन्नदान केले."कोरोना साथीत विशेषतः वृद्धांनी कोणताही आजार अंगावर न काढता त्वरित सरकारी दवाखान्यात संपर्क करावा ! असे आवाहन यावेळी डॉ अनिल शिंदे यांनी लोकांना कोरोनाबाबत जाहिर मार्गदर्शन करतांना केले.
कोरोना मुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत अमळनेर शहरातील मोल मजुरी करणाऱ्यांवर लॉक डाऊन काळात उपासमारीची वेळ आलेली असतानाच हजारो लोकांना अन्नदानासाठी पुढे सरसावल्या वर्धमान संस्कार धाम,गोक्षेत्र प्रतिष्ठाण च्या भानूबेन शाह गोशाळेच्या मदतीस डॉ अनिल शिंदे,सौ.दिपाली शिंदे,डॉ.संदिप जोशी,डॉ.सौ.मयुरी जोशी यांचे नर्मदा मेडिकल फाउंडेशन ने एक दिवसाचा अन्नदानासाठी पुढाकार घेतला.रुबजी नगर येथील अन्नक्षेत्र केंद्रावर डॉ.अनिल शिंदे यांनी सपत्नीक स्वहस्ते अन्नदान केले.याप्रसंगी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे,मा.नगरसेवक संदिप घोरपडे,रणजित शिंदे,सुभाष भोई आदि उपस्थित होते.
दिवसेंदिवस अन्नदानासाठी शहराच्या विविध भागांतील गरजुं कुटुंबातील लोकांची संख्या वाढतच चालली आहे .अश्या वेळी शहरातील दाते गोशाळेतर्फे सुरू असलेल्या या अन्नक्षेत्र समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होऊन योगदान देत असल्याने या संकटकाळी गोरगरिबांच्या जेवणाची सोय होत आहे विविध क्षेत्रातील दात्यांनी असेच पुढाकार घेऊन अन्नदानासाठी सहकार्य करत रहावे असे गोशाळेतर्फे चेतन शाह,राजू सेठ,प्रा.अशोक पवार ,महेंद्र पाटिल, डी ए धनगर यांनी सांगितले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा