Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १९ एप्रिल, २०२०
कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा यांचे तर्फे जाहीर सूचना.
चोपडा प्रतिनिधी अंमळनेर मुंगसे येथील एक महिला कोरोना positive सापडलेली आहे सदरील महिलाच्या संपर्क चोपडा शहरातील काही भागांमध्ये झाल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणुन उद्या पासून तीन दिवस चोपडा तालुका बंद करण्यात आला असून दिनांक 20/04/2020,21/04/2020,22/04/2020 सोमवार ,मंगळवार,बुधवार पर्यत चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व व्यवहार व लिलाव पुर्णपणे बंद राहतील तसेच ज्या शेतकरी बंधूनी दि.20/04/2020 ,21/04/2020 , 22/04/2020 सोमवार ,मंगळवार , बुधवार, रोजी भूसार माल विक्रीसाठी आपले नांव नोंदणी केली होती सदर शेतकरी बंधूनी आपला शेतीमाल विक्री साठी आणु नये हि नम्र विनंती .
कोरॊणा परिस्थितीमुळे
तहसीलदार कार्यालयात आज झालेल्या महत्वाच्या बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकारी व सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व्यापारी प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत असा निर्णय घेण्यात आला आहे की उद्या दिनांक 20 एप्रिल 2020 पासून सोमवार मंगळवार बुधवार तीनही दिवस जीवनावश्यक वस्तूंची दुकाने किराणा व दूध सहित सर्व दुकाने तीन दिवस बंद राहतील फक्त मेडिकल फॅसिलिटी सुरू राहील गुरुवार पासून सलग किराणा अत्यावश्यक सेवा दुकाने सकाळी 8.00 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत सुरु राहतील तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांनी व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी या वेळेचे काटेकोर पालन करावे ही विनंती
अमृतराज सचदेवअध्यक्ष चोपडा तालुका व्यापारी महामंडळ
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा