Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १२ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
गजानन महाराज संस्थांनतर्फे आयसोलेशनाठी ५०० खाटाचा व्यवस्था,४ हजार ३०० जणांना भोजनाच्या पाकिटांचे वाटप
गजानन महाराज संस्थांनतर्फे आयसोलेशनाठी ५०० खाटाचा व्यवस्था,४ हजार ३०० जणांना भोजनाच्या पाकिटांचे वाटप
सर्वे भवन्तु सुखिनः सेवा हीच साधना, शिव भावे जीव सेवा, श्रद्धा भक्ती व सेवा या त्रिसुत्री तत्त्वावर श्री गजानन महाराज संस्थान शेगाव अविरत श्रींची सेवा करत आहे. श्री गजानन महाराज संस्थानची सेवा ही हृदयापासून हृदयापर्यंत पोहोचणारी आहे.
शेगांव(उमेश राजगुरे) बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर संस्थान लॉकडाउनच्या काळात जनसामान्यांच्या मदतीसाठी धावून आले आहे . सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या संस्थानने जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत ·
कम्युनिटी किचन सुरु केले असून , मंदिराच्यावतीन शेगांव मध्ये १५०० तसेच श्री क्षेत्र पंढरपूर व श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री गजानन महाराज संस्थान शाखे मार्फत सकाळ - संध्याकाळ ४०० भोजन पाकिटांचे वितरण करण्यात येत आहेत . तसेच रुग्णांना , शहरात अडकून पडलेले मजुरांना , गरजू कुटुंबांना ही भोजनाची पाकिटे वाटली जात आहेत .
बुलढाणा जिल्ह्यात विविध शहरांमध्ये कोरोनाचे १७ रुग्ण सापडले आहेत . तसेच ग.म. सं. द्वारे ५०० बेड आयोसोलेशनसाठी तयार ठेवले आहे. बुलढाणा शहर हे हाय रिस्क झोनमध्ये आले आहे . अशा परिस्थितीत गरीब मजूर , अडकलेले प्रवासी , बेघर भटके , अनाथ यांना भोजन देण्याकरता जिल्हा प्रशासनाने श्री संत गजानन महाराज संस्थेला विनंती केली होती .
त्यानुसार शेगांव संस्थांनी कम्युनिटी किचन सुरू केली असून बुलढाणा येथे दोन एप्रिल पासून २००० लोकांसाठी पॅकेट स्वरूपामध्ये भोजन प्रसाद वितरित केला जात आहे.प्रशासनच्यावतीने समन्वय म्हणून उपजिल्हाधिकारी दिनेश गीते हे काम पाहत आहे.बुलढण्यात तसेच बुलढाणा शहर च्या परिसरात वास्तव्यास या
असलेल्या नाथजोगी सारख्या भटक्या समजालाही संस्थांनाच्या मदती चा लाभ होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा