Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १२ एप्रिल, २०२०
भोई समाज सुशिक्षित झाला परंतु सुरक्षित नाही... श्री अशोकमोरे, एरंडोल
एरंडोल प्रतिनिधी:माझ्या समाजाचा इतिहास पाहता असे वाटते की, भोईसमाज पूर्वी जितका एकसंघ होता तितका आता मात्र एकसंघ नाही. त्याची अनेक कारणे आहेत त्याचे त्यात विभक्त कुटुंबपध्दत ही आहे. पूर्वी नदी/नाला/तलावाच्या ठिकाणी जाऊन एकत्रित येऊन समूहाने राहत होते. कुटुंब प्रमुखांच्या निर्णयानुसार मासेमारी/डांगर वाडीची कामे होत होती.
कालांतराने यात बदल होऊन काहींनी शिक्षणाच्या ध्यास घेऊन एकाच ठिकाणी आपला संसार थाटून/ मांडून तेथूनच तलाव/नदी/नाला येथे मासेमारी/डांगरवाडीची कामे करू लागली यातूनच काहीच्या मुलांनी शिक्षण घेऊन समाजाच्या नावावर (लाभ घेऊन) नोकऱ्या घेतल्या व काही समाज बांधवांनी आपले पारंपरीक व्यवसायात समाधान मानून जिथे होते तिथेच थांबले; परंतु जे शिकले सवरले त्यांनी फक्त आपले कुटुंब व जवळचे लोकांना नोकऱ्या/रोजगार उपलब्ध करून देण्यातच समाधान मानले. इतरांना मात्र याबाबत त्यांनी त्या काळात काही ही सहकार्य केले नाही ही खंत आताचे त्या काळातील जेष्ठ समाजबांधव करीत आहेत.
आता काळ बदलला आहे बरेच गरीब समाजबांधव आपल्या मुला/मुलींना कष्ट करून शिकवत आहेत परंतू त्यांना रोजगार(नोकरी) मिळणे अशक्य आहे. त्यामुळे आजच्या बराच युवा वर्ग बेरोजगारीमुळे बेचैन झाला असून त्याचाच गैरफायदा घेत काही पक्षाचे पुढारी अश्या युवकांना व्यसनाधिनता बनवत असून आपल्याच समाजात तेढ निर्माण करण्याची कामे करीत करतात आहेत.
तसेच काही ठिकाणी तर आपल्या माता/भगिनीवर अन्याय/ अत्याचार होतांना आपण बऱ्याच वेळेला ऐकतो परंतु आपल्यामध्ये दुहेरी, तिहेरी, गट, तट, आपल्याला त्याचे काय घेणे तो त्याचे बघेल किंवा मी माझे बघेल असे वागणे असल्यामुळे अशी अनेक प्रकरणे दाबली गेलीत किंवा दुर्लक्षित झाली असे म्हणता येईल.
त्यामुळेच की काय माझा समाज सुशिक्षित झाला परंतु सुरक्षित नाहीअसे मला मला तरी वाटते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा