Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ११ एप्रिल, २०२०
कलाशिक्षक राजू साळी यांच्या पैंटींगद्वारे देवरूपी ""मानवांना सलाम""
फैजपूर प्रतिनिधी:सर्व जगात कोरोना विषाणूजन्य महामारी आजाराने थैमान घातले असून भारतात सर्व ठिकाणी लॉकडाऊन असून सुद्धा दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या संख्येत वाढ होत आहे,सर्व रूग्णांना डॉक्टर, नर्स,पोलिस अधिकारी, कर्मचारी, वीज कामगार, सफाई कामगार या सर्व मानवांनी पृथ्वीवर जणू देवरूपांने अवतार घेतला असून सर्वोतोपरी मदत करीत आहेत.
या सर्वांच आपल्या समाजाला काही देणं लागतं, त्यांची मेहनत व अहोरात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढा देऊन मानवांची सेवा करत आहेत.अशा देवरूपी अवतारासाठी श्री.एस.बी.हायस्कूल, चांगदेवचे कलाशिक्षक राजू साळी यांनी आपल्या कल्पकतेने कुंचल्याद्वारे पोस्टर कलर माध्यमातून सुंदर पैंटींग तयार करण्यात आली.असून सदर पैंटींग मध्ये डॉक्टर, नर्स,पोलिस, सफाई कामगार, वीज कामगार,इत्यादी दाखवण्यात आलेलें आहेत."ऐ वतन कीं जान हैं, देश के सच्चे विर गौरव हैं, अभिमान हैं, ऐ सच्चे इन्सान हैं, भगवान हैं, हिंदुस्तान के"!जेंव्हा सर्व भारतीय घरी राहणार, तेव्हाच साखळी कॊरोनाची तुटणार.!अशी घोषवाक्य वापरण्यात आलेली असून राजू साळी यांनी जणू कोरोना विषाणूचा पैंटींगद्वारे जनजागृती करण्याचा संकल्प केलेला आहे.त्याचें या सामाजिक कार्याचे सर्वदूर कौतुक होत आहे.या सर्व पैंटींग विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकाऱ्यांना भेट देण्याचा त्यांचा मानस आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा