Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

लॉक डाऊन मुळे लुक्स बाबत आग्रही तरुणही चिंतेत



उंटावद प्रतिनिधी सध्या कोरोनाआजारामुळे शासनाने 21 दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केल्यामुळे तरुणाई सध्या अनेक अडचणी येत आहेत त्यात वेशभूषेचे सह केशभूषा तरुणना फार महत्वाची वाटते अनेक तरुण हे आपल्या हेअर स्टाईल वर विशेष लक्ष देत असतात सध्या तरुणांमध्ये वन साईट टू साईट जमाई राजा सोल्जर बागी अशा स्टाईल ची क्रेज आहे ह्या हेअर स्टाईल दर पंधरा वीस दिवसांनी तरुण सेट करत असतात तसेच दाढी सेटिंग करायची मोठ्याप्रमाणावर फॅशन रूढ झाली आहे 

लॉक डाऊन मुळे तरूणांना घरीच बसावे लागत असून त्यांचे मोठ्याप्रमाणावर केस व दाढी वाढली असून विचित्र दिसत आहेत काहींचे केस वाईट झाले असून ते दर 15 ते 20 दिवसांनी कलर करत असतात मात्र लॉक डाऊन'मुळे सलुन दुकान बंद 

असल्याने तरुणांना याचा त्रास सहन करावा लागत आहे काही आग्रही तरुण काही काळासाठी सलून उघडे ठेवण्याची मागणी करत आहेत तर काही तरुण घरी येऊन कटिंग दाढी कलर करून देण्याची विनंती सलुन चालकांकडे करत आहेत या मागणीकडे हातावर पोट असलेले कारागीर व्यवसायिक आपला जीव धोक्यात घालून घरी जाऊन सेवा देत आहेत मात्र काही व्यवसायिक कोरोना आजाराच्या भीतीने या मागणीला नकार देत आहेत वर्षानुवर्ष ग्राहकांची मैत्रीपूर्ण संबंध असल्याने नाही म्हणताना खूप त्रास होत आहे असे सलून चालकांचे म्हणणे आहे 

मात्र अनेक ठिकाणी सलून चालकांवर कारवाई झाल्याचे व्हिडिओ बातम्या येत असल्याने अनेक व्यवसायिक नकार देत आहेत तर लॉक डाउन आणखी वाढण्याची भीती असल्याने ग्राहक मात्र चिंतेत आहेत लॉक डाऊनलोड न मोडता घरी राहा सुरक्षित रहा असे आवाहन संघटनेने केला आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध