Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

शासकीय हमी भाव योजने अंतर्गत नाफेड मार्फत हरभरा खरेदी सुरू दोन्ही आमदारांच्या उपस्थितीत शुभारंभ




प्रतिनिधी अमळनेर सोमवारी हरभरा विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्र येथील शेतकी संघाच्या गोदामात सुरू झाली.
सकाळी 10 वाजता काटापूजन यावेळी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते व आमदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत ही खरेदी करण्यात आली.

यापूर्वीच शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी या संबंधित केंद्रात करून घेतली असून त्याप्रमाणे खरेदी सुरू झाली आहे. 
यावेळी बाजार समिती सभापती प्रफुल्ल पवार, सहाय्यक निबंधक गुलाबराव पाटील, शेतकी संघाचे प्रशासक गणेश महाजन संघाचे मॅनेजर संजय पाटील, शुभारंभ प्रसंगी आलेले पहिले शेतकरी देविदास बळीराम पवार पतोंडा उपस्थित होते.

शासकीय खरेदी केंद्रात हरभरा खरेदीसाठी एकूण 848 शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे नोंदणी साठी 30 एप्रिलपर्यंत आपला माल मुदतीत क्रमांक प्रमाणे आणावा अंतिम मुदत आहे. पहिल्या दिवशी मोजणी साठी 12 शेतकऱ्यांना मेसेज सोडण्यात आले आहेत हरभरा हमी भाव 4875 असा आहे हेक्टरी मर्यादा 14:50 क्वि इतकी आहे

यंदा हरभऱ्याची पेरणी तालुक्यात विक्रमी झाली आहे. त्यामुळे खरेदी सुरू झाली आहे.

सध्या कोरोना असल्याने बाजार समिती बंद आहे. बाजार समिती सुरू झाली की हरभऱ्याची प्रचंड आवक वाढेल. यामुळे दरांवर दबाव येऊ शकतो. शेतकऱ्यांचे नुकसान होईल. यासाठी हे खरेदी केंद्र सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध