Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
रेशनिंगचे ११५ पोती धान्य काळ्याबाजारात घेऊन जात असल्याच्या संशयावरून पोतींसह ट्रक जप्त……
रेशनिंगचे ११५ पोती धान्य काळ्याबाजारात घेऊन जात असल्याच्या संशयावरून पोतींसह ट्रक जप्त……
शिरपूर प्रतिनिधी दि ११ रोजी आंतरराजीय सिमा तपासणी नाका हाडाखेड येथे वाहन तपासणी दरम्यान एक एम.एच ०४ जी.ए ६६२५ क्रमांकाचा मालट्रक मध्यप्रदेशाकडून मुंबई येथे जात असल्याचे आढळले.त्यावेळी सदर वाहनांमध्ये चोरून लपुन प्रवासी नेले जात आहेत काय ? याबाबत तपासणी करण्याकरिता चेकपोस्टवरील कर्तव्यास असणारे पोलीस कर्मचारी यांनी ट्रक मधील मालाची पाहाणी केली
असता सदर ट्रक मध्ये ठेवलेल्या धान्याच्या पोत्यांवर फुड कॉरपरेशन ऑफ इंडीया तसेच काही गोण्यांवर छत्तीसगड राज्य सरकारी विपणन संघ मर्यादित असे शिक्के मारलेले आढळुन आले.त्यामुळे सदर मालाबाबत वाहन चालकास कागदपत्रांची विचारणा केली असता सदर मालाबाबत समाधान कारक दस्तऐवज मिळुन आले नाहीत. त्यामुळे सदरचे वाहन हे शिरपूर तालुका पो.स्टे येथे मोटार वाहन कायदा कलम २०७ प्रमाणे ताब्यात घेवुन सदर बाबत तालुका पुरवठा अधिकारी शिरपूर यांना लेखी पत्रव्यवहार करून सदर मालाची तपासणी होवून सदरचा माल हा सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबधित आहे का ?अगर कसे याबाबत अहवाल मागण्यात आला असुन सदर पत्राचे अनुषंगाने पुरवठा अधिकारी शिरपूर यांनी सदर मालाची तपासणी करून मालाची नमुने घेतले आहेत.
तरी पुरवठा अधिकारी यांचे अहवालानुसार सदर प्रकरणी पुढील कारवाई शिरपूर तालुका पोलीसांकडुन करण्यात येणार आहे. हि कारवाई पोसई नरेंद्र खोरणार,पो.हे कॉ संजय माळी,संजीव जाधव,पो.कॉ कुंदन पवार ,कैलास पुरोहित,भुषण चौधरी यांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा