Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांच्या मदतीने रुग्णास घरपोच औषध



अमळनेर:प्रतिनिधी तालुक्यातील मारवड पोलीस हद्दीतील पाडळसे येथील सचिन पाटील यांच्या आईचे डायलीसीसचे औषधं फक्त दोन दिवसांकरीताच शिल्लक राहिले होते. 

व ते फक्त औरंगाबाद व पुणे येथेच मिळत असल्याने त्यांना काही सुचत नव्हते. ते लाॅक डाऊन तोडुन परस्पर जाण्याच्या विचारात असतांनाच पत्रकार वसंतराव पाटील पाडळसे यांनी त्यांना मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरक्षक राहुल फुला यांचेकडे पास मिळतो का? हा तपास करायला पाठविले तेव्हा मेडीसीन ही अत्यावश्यक सेवा आहे . 

व घरपोच सेवा देण्यावर शासनाचा भर आहे. पास ची काही आवश्यकता नाही असे सांगुन लागलीच स्वत: राहुल फुला यांनी औरंगाबाद येथील एजन्सी चालकास स्वत:च्या मोबाईलवरुन फोन केला व यापुर्वी पोलीस उप निरीक्षक असतांना सन २०१० ते २०१४ पावेतो औरंगाबाद सिटी चौक पोलीस स्टेशन येथे नोकरी केली असल्याने तेथील आपल्या जुन्या व प्रतिष्ठीत मित्र परिवाराची ओळख दिली. 

एजन्सी चालकास त्यांचेकडुन खाजगी वाहनाची मदत घेण्यास व प्रवासामध्ये रस्त्यात कोणी काही अडचण केल्यास आम्हास संपर्क करण्याचे सांगुन विश्वास दिला आणि सदर औषधं मारवड पोलिस ठाण्याला किंवा सचिन पाटील यांच्या घरी घरपोच औषधं पाठविण्या करीता पाठपुरावा केला. ती औषधं दि. ५ एप्रिल २०२० रोजी खाजगी वाहनाने प्राप्त झाल्याने त्यांचे घरी जावुन दिली असता त्यांचे आई सह संपुर्ण परिवार खुपच भारावुन गेला व त्या सर्वांनी राहुल फुला सपोनि, मारवड व वसंतराव पाटील यांचे आभार व्यक्त केले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध