Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २० एप्रिल, २०२०

शिरपूर शहर पोलीस स्टेशन व मी शिरपूरकर च्या वतीने तालुक्यातील आशा सेविकांंचा सत्कार करून त्यांंना सँनिटाईझर किट वाटप करण्यात आले


शिरपूर प्रतिनिधी कोरोनाच्या काळात प्रत्येकाच्या घरापर्यंत स्वताचे आरोग्य धोक्यात घालून आशा सेविका आपले कार्य करत आहेत. 

त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने शिरपूर शहर पोलीस स्टेशन व मी शिरपूरकर च्या वतीने तालुक्यातील आशा सेविकांंचा सत्कार करून त्यांंना सँनिटाईझर किट वाटप करण्यात आले.

शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे आज ११ वाजेच्या सुमारास शहर पोलीस स्टेशन व मी शिरपूरकर च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,मी शिरपूरकरचे सदस्य यांच्यासह तालुक्यातील आशासेविका उपस्थित होते.
कोरोनाच्या लढ्यात आशा सेविका योध्दा सारखे कार्य करत असल्याने आशा सेविकांंचा यावेळी सत्कार करण्यात आला व सँनिटाइजींग किट वाटप करण्यात आले.यावेळी आशा सेविकांंनी काम करतांना येणाऱ्या वाईट व चांगले अनुभव यावेळी व्यक्त केले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध