Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० एप्रिल, २०२०
लॉकडाऊनचा विद्यार्थ्यांनी घेतला ऑनलाईन स्पर्धेच्या माध्यमातून पुरेपूर फायदा
आपल्या भारत देशातील व राज्यातील सध्याची परिस्थिती कोरोना संसर्गजन्यरोगामुळे खूपच महाभयंकर झालेली आहे.या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे.आपल्या राज्यातील कोरोना बाधीताची संख्या तर देशाच्या तुलनेत सर्वाधिकच.ही कठीण परिस्थिती लक्षात घेता मुलांसाठी लॉकडाऊनचा हा कठीण काळ,मुलांना घरात बसवून ठेवणे पालकांसाठी अगदी जिकिरीचे काम हेच काम सुकर होण्यासाठी परंडा येथे ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले , स्पर्धेसाठी उत्स्पूर्त प्रतिसाद मिळाला अगदी राज्यभरातून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले,व लॉकडाऊनचा हा कठीण वाटणार काळ विद्यार्थ्यांसाठी अगदी दिलासदायक व मनोरंजक झाला.
परंडा येथील प्रा.अमोल निकाळजे यांनी,5 एप्रिल ते 14 एप्रिल 2020 दरम्यान 14वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी. राजमुद्रा ग्रुप कडून कोरोना रोगामुळे विद्यार्थ्यांना मिळालेल्या सुट्ट्यांचा उपयोग व्हावा व तणावाच्या वातावरणातून विद्यार्थी मुक्त व्हावा म्हणून Dance Competitioसोशल मीडियाचा वापर करून घेण्यात आले होते
दोन ग्रुपमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत राजमुद्रा लाईव्ह संघाने बाजी मारली. संघाची कर्णधार आर्या जेजुरकर हिने डान्स स्पर्धेत सहभागी केल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करताना संघातील यशस्वी खेळाडू व पालकांना शुभेच्छा दिल्या.
राजमुद्रा लाईव्ह संघात आर्या जेजुरकर, आकांक्षा नायक, अन्विशा गारटे, समृद्धी कांबळे, चैतन्या निकाळजे व सर्वज्ञा वायकर यांचा समावेश होता.
विरुद्ध संघ राजमुद्रा प्रिंट ची कर्णधार अन्विका वायकर हिने देखील स्पर्धेत अप्रतिम नृत्य सादर केले होते. दोन्ही संघातील खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक झाले.
स्पर्धेचे स्वरूप शिक्षकांसाठी, पालकांसाठी व मुलांसाठी देखील नवीनच होते. तरी देखील सर्व स्पर्धकांनी चांगला प्रतिसाद दिला. नवनवीन बालनृत्यकाराचा परिचय झाला.स्पर्धकांनाही वेगवेगळी नृत्य पाहीला मिळाली. प्रत्योकाची नवनवीन नृत्यशैली पाहता आली अनुभवता आली. या निमित्ताने मुलांची क्षमता तपासता आली.
मित्र मंडळी नातेवाईक यांनी like , comment, share च्या माध्यमातून भरभरून प्रतिसाद दिला. या शुभेच्छाच या स्पर्धकांच्या पुढील वाटचालीसाठी वरदान ठरणार आहेत.
निकाल काहीही असो आपण या स्पर्धेचे आयोजन करून या चिमुकल्यांना संधी दिलीत त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. असेच समाजोपयोगी कार्य आपल्या हातून होवो हिच मनोकामना. व पुढील आपल्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असे पालक वर्ग म्हणत आहे.
श्री.राहूल शिंदे
चिंचपूर(बु) ता.परंडा.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा