Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ एप्रिल, २०२०

नगाव येथे रेशन आपल्या दारी : कोरोना इफेक्ट


अमळनेर i प्रतिनिधी  – (शिवाजी पारधी ) कोरोनो व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात भीतीचे वातावरण आहे. या आजाराच्या उपाययोजनेसाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना करत नागरिकांना घरात थांबण्यास व  दोन व्यक्तीमध्ये एक मिटरचे अंतर ठेवण्याच्या सूचना व आदेश देण्यात येत आहेत. अश्या बिकट परिस्थितीत गरीब  जनतेसाठी असलेल्या रेशन प्रणालीची योजना  कोरोनो पार्श्वभूमीवर नागरिकांनमध्ये सुरक्षित अंतर ठेवून   यशस्वीपणे राबविणे हे देखील एक आव्हान अधिकारी व कर्मचारी यांच्या पुढे आहे.

अमळनेर तालुक्यातील  नगाव येथील महिला रेशन दुकानदार श्रीमती .कोकीळाबाई रामपुरी गोसावी यांनी स्वतःच्या ट्रक्टरवर नागरिकांना रेशन धान्य घरपोच पोहचविले आहे. “रेशन आपल्या दारी “ ही योजना प्रत्यक्ष राबविण्याचे काम अमळनेर तालुक्यातील महिला रेशन दुकानदार यांनी केले आहे. यासाठी त्यांनी एक अभिनव शक्कल लढविली धान्य वाटप करत असतांना ट्रोलीला पीव्हीसी पाईप लावण्यात आला होतो त्यामुळे धान्य मोजल्यानंतर ते स्पर्श न करता लाभार्थीच्या पिशवीत पडत होते .धान्य वाटप करत असतांना त्यांनी लाभार्थीना एक डेटॉल साबण व मास्क मोफत वाटप केले. जळगांव जिल्ह्यातील त्या घरपोच धान्य वाटप करणाऱ्या  एकमेव रेशन दुकानदार ठरल्या आहेत.त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाला अमळनेरच्या प्रांत सीमा अहिरे ,तहसीलदार मिलिंद वाघ ,पुरवठा अधिकारी बावणे ,सरपंच महेश पाटील रेशन दुकानदार यांचे सुपुत्र पोलीस पाटील प्रविण गोसावी ,ग्रामसेवक महेंद्र पाटील ,दक्षता समिती सदस्य तुषार पाटील,धुपी येथील रेशन दुकानदार भागवत पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

“कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर नगाव येथील रेशन दुकानदार यांनी घरपोच धान्य वाटप केलेल्या उपक्रमाचे मी स्वागत करतो ” – जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी

“ देशातील कोरोना रोगाच्या संकट  प्रसंगी तालुक्यातील गरीबांच्या हक्काचे रेशन  खावून भ्रष्टाचार करणाऱ्या रेशन दुकानदारांची गैर केली जाणार नाही. रेशन दुकानदार लाभार्थींच्या  हक्काचे परिपूर्ण धान्य देत नसल्यास संपर्क करावा ” – पंकज पाटील (सामाजिक कार्यकर्ते) मो.नं.८००७००९१५५  मो.नं.८००७००८०९९

“कोरोना आजाराची काळजी घेतांना कुटुंबातील व्यक्तींनी इतरत्र लोकांच्या संपर्कात न येता आपली काळजी आपणच घ्यावी . बाहेर गावातून आलेल्या व्यक्तींनी घरातच राहावे व वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावेत” – प्रांत सीमा अहिरे अमळनेर

“एप्रिल ,मे व जुन  या तीनही महिन्याचे धान्य टप्प्याटप्याने अंत्योदय , प्राधान्य कुटुंब लाभार्थींना वाटप करायचे आहे. धान्य वाटप करताना रेशन दुकानदार यांनी दुकानात गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवून धान्य वाटप करावे . रेशन दुकानात गर्दी झाल्यास त्या रेशन दुकानदाराना जबाबदार धरून  उचित कारवाई करण्यात येईल याची तालुक्यातील रेशन दुकानदारांनी गांभीर्याने दखल घ्यावी  ”- तहसिलदार मिलिंद वाघ अमळनेर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध