Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

स्थानिक गुन्हे शाखा धुळे कार्यवाही शिरपूर तालुक्यात लाखोंचा मद्यसाठ जप्त



शिरपूर प्रतिनिधी:काल दि.५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी सापळा रचून शिरपूर तालुक्यातील एका कार मधून व आंबा गावातून आरोपीसह लाखोंचा देशी दारूचा मद्यसाठा जप्त केला आहे . 

याबाबत पो. नि . शिवाजी बुधवंत सो यांना गुप्त बातमी दारा मार्फत माहिती मिळाली होती की .आंबा गावाच्या शिवारात अमरीश नगर येथे राहणारा प्रवीण पावरा हा देशी व विदेशी दारू बाळगून चोरट्या मार्गाने विक्री करत आहे . 

यावरून पो. नि. शिवाजी बुधवंत सो यांनी एक पथक तयार करून ते खाजगी वाहनाने रवाना झाले असता त्यांना खबर मिळाली की. कार क्र . MH 18 vc ०९५१ ही गाडी नमूद ठिकाणी देशी विदेशी दारू साठा घेण्यासाठी गेले आहे . त्यानुसार सदर पथकाने आंबा गावाच्या शिवारात आपली गाडी दिसणार नाही अश्या ठिकाणी लावून दबा धरून बसले असता १७ वाजून ३० वाजता सदर क्रमांकाची गाडी आली असता तिला अडवून तपासणी केली . 

त्यात ७३,६७० ₹ किंमतीची  देशी दारू मिळून आली . सदर चा साठा कोठून खरेदी केला याची चौकशी करून त्यास सोबत घेऊन आंबा गावाच्या शिवारातील अमरीश नगर येथे छापा टाकला असता एकूण ७,६४,३४०₹ किमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला यात आरोपी यांच्या जबाबानुसार प्रवीण पावरा राहणार अमरीश नगर , दीपक धोबी , जयपाल राजपूत रा. पळासनेर हे दारू विक्रीचा व्यवसाय करत असताना मिळून आले . यावेळी पोलिसांचा छापा पडला . हे पाहून प्रवीण पावरा आणि दीपक धोबी हे पसार झाले मात्र जयपाल राजपूत पोलीसांच्या हाती लागला . 

त्यास विचारपूस केले असता  सदर चा माल हा रितेश जयस्वाल रा. पळासनेर यांच्या कडून खरेदी केल्या बाबत चे समजले या कार्यवाहित छापा टाकलेल्या ठिकाणाहून आणि कार मधून दहा प्रकारच्या देशी आणि विदेशी दारु साठा एकुण की. ७,६४,३४०  जप्त करण्यात आला . पोलीस कॉ. राहुल सानप यांच्या तक्रारी वरून वरील सर्वांच्या विरोधात दारू बंदी कायदा कलम  ६५ई प्रमाणे शिरपूर तालुका पोलीस स्टेशन इथे तक्रार दिले आहे . यात विशाल विनायक वाघ व हितेश जयस्वाल यांच्या सह जयपाल राजपूत , प्रवीण पावरा , आणि दीपक धोबी इ . चा समावेश आहे .  

सदर ची कार्यवाही मा . पोलिस अधीक्षक सो .चिन्मय पंडित ,अप्पर पोलीस अधीक्षक सो. राजु भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली व मा .पो .नि .श्री .शिवाजी बुधवंत यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील सहकारी पो .स .ई .अनिल पाटील  , को . कॉ . रफिक पठाण, पो . ना . प्रभाकर बैसाने ,श्रीकांत पाटील ,गौतम सपकाळे , राहुल सानप यांनी केले आहे .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध