Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ७ एप्रिल, २०२०
शब ए बारात ची नमाज घरीच अदा करा पोलिसांचे आव्हान
प्रतिनिधी रावेर ९ एप्रिल गुरुवारी येणाऱ्या शबे बारात ची नमाज मुस्लिम समाजाने आपापल्या घरी अदा करावी व कोणीही मस्जिदी मध्ये येऊ नये अशी विनंती फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी आज रावेर पोलीस स्टेशन मध्ये केली यावेळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे उपस्थित होते.
रावेर पोलीस स्टेशन मध्ये रावेर मुस्लिम पंच कमिटी व रावेर शहरातील सर्वमस्जिदिचे इमाम मशिदीचे प्रमुख यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली त्यात पोलिसांतर्फे विनंती करण्यात आली.
सदर बैठकीत पंचकमेतीचे ग्यास शेख, युसुफ खान, नगर सेवक सादिक शेख, अ. रफिक, असदुल्लाह खान,तसेच मौलाना ग्यास,मौ सईद, मौ नजर, मौ इसहाक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत माननीय पोलिस उपविभागीय अधिकारी व पो नि रामदास वाकोडे यांच्या आव्हानास प्रतिसाद देऊन तसेच मानवतेच्या दृष्टिकोनातून व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुस्लिम समाज हा शबे बारात हा आपला सण घरीच साजरा करतील व घरातच रात्रभर नमाज अदा करतील कोणीही रावेर शहरातील मध्ये जाणार नाही अशी हमी या मुस्लिम समाजाच्या प्रमुखांनी पोलिसांना दिलेली आहे.
पोलिसांनी सुद्धा विनंती केली असल्याने शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजाने प्रशासनाच्या आव्हानास प्रतिसाद देऊन कोणीही मसजिद मधे जाऊ नये असे आवाहन मुस्लिम समाज व पोलीस दलातर्फे करण्यात आलेले आहे.
या ऊपर ही कोणी जबरदस्ती करून मस्जिद मधे आल्यास त्यांच्यावर कायदेशीर करवाई करण्यात येईल असे सुद्धा ठरले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : तालुक्यातील गांधली येथील १० रोजी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह १२ रोजी विहिरीत आढळून आल्याची घटना उघडकीस आली. गांधली येथील जयश्र...
-
अमळनेर :- दोन मोटारसायकलची समोरासमोर टक्कर होऊन चोपडा तालुक्यातील घुमावल येथील एक जण जागीच ठार झाल्याची घटना 12 रोजी दुपारी 12 वाजता तालुक्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा