Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

जमाव बंदीत’गर्दी करू नका’हटकले पोलिसांवर ग्रामस्थांचा हल्ला,जोरदार दगडफेकीत चार पोलीस जखमी तर वाहनाचेही केले नुकसान



शिरपूर (प्रतिनिधी) कोरोणाच्या पार्श्वभूमीवर जमाबंदी असताना किराणा दुकानावर गर्दी केलेल्या ग्रामस्थांना बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांनी हटकले असता ग्रामस्थांनी पोलिसांवर हल्ला केल्याने चार पोलीस जखमी झाले असून पोलीस वाहनाचे ही नुकसान करण्यात आले आहे.सदर घटना ही शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे दि.७ एप्रिल २०२० रोजी ८:३० वाजेच्या सुमारास घडली आहे.

देशभर कोरोनाने थैमान घातले असल्याने देश लॉक डाउन करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगवी यांनी वेळोवेळी पेट्रोलिंग करीत आपल्या हद्दीत चोख बंदोबस्त ठेवला आहे.

दि७ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील हे आपल्या कर्मचाऱ्यांसह लाकड्या हनुमान परिसरात पेट्रोलिंग करीत असताना लाकड्या हनुमान गावात एका दुकानावर जमाव बंदीचे उल्लंघन केल्याचे दिसुन आले.तसेच दारू विक्री होत 

असल्याच्या संशया वरून पोलिसांनी दुकानदारासह गावकऱ्यांना हटकले व समज देण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामस्थांनी पोलिसांनाच दमदाटी केली तसेच हल्ला अचानक दगडफेक करीत हल्ला केला यावेळी बंदोबस्तावरील योगेश बाळकृष्ण मोरे पोहेकॉ लक्ष्मण गवळी,पोकॉ योगेश दाभाडे, पोना चव्हाण पोकॉ राजीव गीते हे जखमी झाले.

याप्रकरणी पोकॉ योगेश बाळकृष्ण मोरे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाणे सांगवी येथे रामदास नसा पाडवी,सहदेव पितांबर पाडवी,दीपक सखाराम पाडवी,दुकानदार विश्वास शिवाजी पाडवी व १०/१२अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांनी भेट देत गावात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध