Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ एप्रिल, २०२०
प्रभाग क्र ९ झ लढा देण्यासाठी घरोघरी जनजागृती मोहीम
शिरपूर(प्रतिनिधी) प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभाग क्र.९.ची जबारदारी मा.नगरसेवक रावसाहेब प्रभाकरराव चव्हाण व मा.नगरसेविका सौ, छायाताई शामकांत ईशी , शामकांत ईशी व स्वयंसेवक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसप्रशासनाचे पोलिस प्रवीण अमृतकर, संजय वाणी, दिनेश माळी,पारधी सरांनी व त्यांच्या सहका-यानी आजच प्रभाग क्र ९ मध्ये घरोघरी जाऊन वार्डातल्या लोकांना पुढीलआव्हान केले.घरात रहा सुरक्षित रहा.
घरातील जेष्ठांची काळजी घ्या.
लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
कामाशिवाय बाहेर पडू नका
महत्वाचे काम असेल तर घरातील एकाच व्यक्तिने बाहेर पडावे.तोंडाला मास्क लावावा. वारंवार हात धुवावे. एकमेकांना सहकार्य करा.घरातच राहुन कोरोनाला हरवा.शासनाच्या नियमांचे पालन करा. असे आवाहन केले,
यावेळी मा..रावसाहेब प्रभाकरराव चव्हाण (नगरसेवक)
सौ, छायाताई शामकांत ईशी (नगरसेविका)
स्वंयसेवक-दादासो.शामकांत ईशी ,नगरसेवक इर्फान मिर्झा,आप्पासो.राजेद्र माळी राजु चौधरी रवि गुप्ता, दिनेश चौधरी, भुषण चव्हाण ,विक्की चौधरी, पिन्टु धोबी, किशोर चव्हाण, महेश चौधरी, आशिष चौधरी, दुर्गेश चौधरी, मयूर धोबी, राजू खाटीक,सादिक खाटीक, परवेझ मलिक,आंबिद मंसुरी, नड्डू, मयूर चौधरी, प्रकाश चौधरी, उत्तम चौधरी,प्रतिक ईशी, संदीप माळी,राहुल माळी,आप्पा वाघ, गणेश सोनार,मयूर शिंपी डॉ नितीन शाह यांचेसह प्रभागातील नागरीक महिला सहभागी झाले होते. यावेळी सोशल डिस्टनसिंग ठेवण्यात आले होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा