Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

नगाव येथील गंगामाई औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. कुंदन देवरे व प्रा. विशाल लाड यांचा सारीवरील लेख GJRA मध्ये प्रसिद्ध होणार.



धुळे प्रतिनिधी तालुक्यातील नगाव येथील नगाव एज्युकेशन सोसायटीच्या गंगामाई औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. कुंदन हेमंत देवरे व प्रा. विशाल लाड यांचा "कौसेस, प्रिवेंशन अँड कंट्रोल ऑफ सारी डीसिज " हा लेख ग्लोबल जर्नल ऑफ रिसर्च अनालिसिस मध्ये प्रसिद्ध होणार आहे त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर हा 5.95 एवढा आहे.

          
सारी अर्थात सेवर अॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन ह्या आजाराने थैमान घातले आहे. त्यावर मार्गदर्शन करणारा लेख ऑनलाईन पाठवला होता. त्यात सारी आजाराबाबत जागरूकता निर्माण करून त्याला कशाप्रकारे टाळता येईल याबद्दल मारगदर्शन करण्यात आले आहे. हा लेख भारताबरोबरच जगभरातील देशांनामध्ये जागृती निर्माण करून सारी आजाराला आळा घालायला मदत करेल.

प्रा. कुंदन देवरे यांनी सांगितले की, सारी हा आजार काय आहे, त्याचा फैलाव कशा पध्दतीने होतो, त्याला कसे टाळता येईल कुठल्या गोष्टी कराव्यात जेणे करून त्याच्यावर आळा घालता येईल व काय उपाय करता येणे आपल्याला शक्य आहेत ज्यामुळे आपण सारीचा फैलाव रोखू शकतो, याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी या लेखातून दिली.

     
प्रा. कुंदन देवरे व प्रा. विशाल लाड यांच्या या लेखाबद्दल त्यांचे संस्थेचे सचिव बाळासाहेब श्री. मनोहर भदाने, उपाध्यक्षा सौ. ज्ञानज्योती भदाने, अध्यक्ष श्री. रामदादा भदाने, प्राचार्य डॉ. अनिलकुमार टाटिया, उपप्राचार्य डॉ. सुफियान अहमद व सहकारी प्राध्यापकांनी कौतुक केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध