Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर येथील संघरक्षक उर्फ धुमा भाऊ तायडे यांनी ज्यांचे हातावर पोट असलेल्या ३० गरीब गरजू व विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले.
रावेर येथील संघरक्षक उर्फ धुमा भाऊ तायडे यांनी ज्यांचे हातावर पोट असलेल्या ३० गरीब गरजू व विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले.
रावेर दि .२९( प्रतिनिंधी )कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन असल्याने ज्यांचे हातावर पोट आहे. हाताला काम नाही व रेशन दुकानातुन धान्य मिळत नाही.अशा लोकांना जिवन आवश्यक वस्तुचे किट तयार करुन गरीब व गरजु लोकांना दानशूर व्यक्तीतीनी पुढाकार घेऊन वाटप करावे असे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यानी आवाहन केले होते या आवाहानाला प्रतिसाद म्हणून रावेर येथील संघरक्षक उर्फ धुमा भाऊ तायडे यांनी ज्यांचे हातावर पोट असलेल्या ३० गरीब गरजू व विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे ज्यांचे हातावर पोट असलेल्या हाताला काम नसलेटल्या व रेशनचे धान्य न मिळणाऱ्या ३० गरीब गरजू व विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तु यात गहू, तांदूळ, साखर, चहा पावडर, मुंग डाळ, मीठ मिरची, तूर डाळ, या वस्तूंचे किट तयार करून प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, मुख्याधिकारी न.पा. रावेर रवींद्र लांडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत व यांच्या हस्ते 30 गरीब व गरजू व विधवा महिलांना वाटप करण्यात आले. या वेळी युवा सामाजिक कार्यकर्ते संघरक्षक उर्फ धुमा भाऊ तायडे, रावेर मंडळ अधिकारी सचिन पाटील, रावेर तलाठी डी. व्ही. कांबळे, वाहन चालक उमेश तळेकर व अरविंद बोरसे, पत्रकार जयंत भागवत, शालीक महाजन, फुले, शाहू ,आंबेडकर, बहुउद्देशीय सेवाभावी संस्थचे अध्यक्ष पत्रकार राजेंद्र अटकाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष सावन मेढे, खजिनदार व आपले सरकार सेतू केंद्र तहसिल कार्यालय रावेर व्यवस्थापक धनराज घेटे, सचिन तायडे, अनिता तायडे, गणेश तायडे, तुषार निकम, समाधान तायडे यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील महिला व पुरुष सोशल डिस्टनसिंग चे पालन करून व तोंडाला मास्क लावून उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा