Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ एप्रिल, २०२०
शासनाने स्थगिती उठवली ; जळगावात ४२ कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया होणार
महापौरांकडून शासन, आ.महाजनांचे आभार : महापौर, नगरसेवक उद्या सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची भेट घेणार
जळगाव प्रतिनिधी: जळगाव शहरातील विकास कामांकरीता विविध योजने अंतर्गत शासनाने वितरीत केलेल्या निधीतून करण्यात येणार्या कामांना शासनाने स्थगिती दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी 100 कोटींचा निधी मंजूर केला होता. 100 कोटींपैकी 42 कोटींच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरु केली होती. मात्र शासनाने विकास कामांकरीता दिलेल्या निधीतून करावयाच्या कामांना स्थगिती दिली होती.
त्यामुळे कामांना ब्रेक लागला होता. दरम्यान,शासनाने स्थगिती उठविली असल्याने कामे पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली. दरम्यान, कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार असल्याने मुख्य अभियंत्यांची उद्या दि.२२ रोजी महापौरांसह काही नगरसेवक भेट घेणार आहे.
जळगाव शहराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या 100 कोटींच्या निधीची स्थगिती शासनाने उठविली आहे. त्यामुळे शासनासह निधीसाठी पाठपुरावा करणारे माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांचे आभार. शासनाने स्थगिती उठविल्यामुळे शहरातील 42 कोटींची विकासकामे आता होणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे यांची बुधवार दि.22 रोजी भेट घेणार असल्याचे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले.
42 कोटींच्या निविदेला ग्रीन सीग्नल
शहराच्या विकासकामांसाठी मिळालेल्या 100 कोटींच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. 100 कोटींतून 42 कोटींच्या कामांची निविदा काढून 30 डिसेंबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या होत्या .मात्र शासनाने विकास कामांकरीता दिलेल्या निधीतून करावयाच्या कामांना स्थगिती दिली होती. दरम्यान,स्थगिती उठविण्यात आल्याने मार्ग मोकळा झाला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा