Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २ मे, २०२०
रेशन माल वाहतूक करण्याऱ्या टाटा 407 गाडीचा बोराडी जवळ मोठा अपघात
बोराडी ता.शिरपूर (प्रतिनिधी) शिरपूर बोराडी रस्त्यावरील बोराडी येथील अमरधाम जवळ बोराडीहुन शिरपूरकडे जाणाऱ्या टाटा कंपनीची ४०७ गाडीचा एस्कल राँड तुटल्यामुळे गाडी रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. हयात तिन जण जखमी झाले आहेत.
बोराडी येथे स्वस्त धान्य दुकानावर गहू व तांदूळाचा माल पोच करण्यासाठी शिरपूरहुन महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारित धान्य वितरण कंपनीची ४०७ गाडी क्रमांक एम.एच.०८ एच ४७५८ गाडी माल खाली उतरून शिरपूर कडे जात होती.
हया गाडीमध्ये तिन लोक होते. हयात चालक सुकनंदन देवीदास कोळी (वय-५०) राहणार वाघाडी,हमाल दिनेश माळी (वय-२६) शिरपूर, एकाचे नांव माहीत नाही. हयामध्ये चालक व एक व्यक्ती जबर जखमी झाले आहेत.हया जखमींना तातडीने बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०८ रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. गावातील शंशाक रंधे,भागवत पवार, शरद पाटील, निंबा पाटील आदींनी गाडीमधील अडकले जखमींना बाहेर काढून मदत केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा