Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २ मे, २०२०
धामोडी येथे दोन गटात दंगल;दगड विटा,लोखंडी कडा ,फायटर चा वापर
निंभोरा पोलीसात 27 जणांविरुद्ध गुन्हा
दाखल
आमदार चंद्रकांत पाटील यांचे शांततेचे आवाहान.....
खिर्डी प्रतिनिधी: धामोडी येथे दि.1 रोजी रात्री 10:15 वाजेच्या सुमारास जुन्या किरकोळ कारणांमुळे येथे दोन गटात हाणामारी झाली असून त्याचे रूपांतर दगड विटा फेकीत झाले होते.दोन्ही गटाकडून वेगवेगळ्या फिर्यादीनुसार निंभोरा पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पहिल्या फिर्यादीत विनोद जगन्नाथ मेढे रा.धामोडी यांनी म्हटल्यानुसार आरोपी योगेश वासुदेव पाटील,रत्नाकर वसंत महाजन,आकाश उर्फ सोनू संजय पाटील,गोपाळ वसंत महाजन,योगेश मधुकर पाटील,शारदाबाई श्रावण पाटील,धीरज संजय पाटील,रमेश मोतीलाल पाटील,पवन पितांबर पाटील,दिलीप वासुदेव पाटील,प्रल्हाद दिनकर पाटील,ठकुलाल शांताराम पाटील,सर्व रा.धामोडी यांच्या विरोधात निंभोरा पोलिसात भादवी कलम 307,295,143,144,147,148,149,504,506,188,269,270,कोविड 19 चे नियम 11 चे उल्लंघन अ. जा.ज.का.कलम 3(2)(5)3 (1)3(10)महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) चे उल्लंघन कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.यात नमूद केल्यानुसार 1 मे रोजी रात्री 10:15 च्या रात्री धामोडी गावात गैर कायदाने मंडळी जमवून हातात दगड विटा,घेऊन तुम्हाला एकालाही जीवनात सोडणार नाही तुम्ही माजले आहेत असे बोलून वाड्यातील लोकांवर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच हातातील दगड ,विटा फेकून मारून त्यात फिर्यादी ची काकू वतसलाबाई संजय मेढे हिस डोक्यात व टोपलू देवचंद मेढे यांच्या पायास दुखापत करून आरोपी शारदाबाई श्रावण पाटील,व आकाश उर्फ सोनू संजय पाटील यांनी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली,जमावाने धार्मिक भावना दुखावल्या म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे,दुसऱ्या गुन्ह्यात आकाश संजय पाटील याचे फिर्यादीनुसार आरोपी जितेंद्र मेढे ,अजय मेढे,ईश्वर किशोर मेढे,दीपक किशोर मेढे,किरण टोपलू मेढे,विशाल अनिल मेढे,विशाल विनोद मेढे ,संजय कालिदास मेढे ,सूरज विनोद मेढे ,भूषण गौतम मेढे,शुभम टोपलू मेढे,प्रमोद राजधर मेढे,विनोद जगन्नाथ मेढे सर्व रा.धामोडी ता.रावेर यांच्यावर भदावी कलम 307,323,324,143,144,147,148,149,504,506,188,269,270,व कोविड 19 चे नियम 11 चे उल्लंघन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 151 चे कलम 37 (1)(3) चे उल्लंघन कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून फिर्यादीने म्हटल्याप्रमाणे आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमून हातात दगड विटा घेऊन फिर्यादीत काल तुला कमी मार झाला असेल आता तुला व तुझ्या आजी शारदाबाई व काका गोपाळ पाटील यांना आम्ही वाड्यातून परत जाऊ देणार नाही व तंगडे, तोडून टाकू व तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे बोलून शिवीगाळ करून फिर्यादित जीवे ठार मारण्याची उद्देशाने बाजूला पडलेल्या दगड विटा उचलून फेकून मारल्या तसेच आरोपी जितेंद्र मेढे ,अजय मेढे ,ईश्वर मेढे,दीपक मेढे,विनोद मेढे,भूषण मेढे,यांनी फिर्यादीच्या उजव्या डोळ्याखाली लोखंडी कडा व फायटर मारून दुखापत केली म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.
दंगली नन्तर यांच्यावर उपचार चालू
वतसलाबाई संजय मेढे,टोपलू देवचंद मेढे,आकाश संजय पाटील ,गोपाळ श्रावण पाटील,
घटनास्थळी चोख बंदोबस्त
फैजपूर उप विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे,निंभोरा सा.पो.नि.महेश जानकर, उप निरीक्षक योगेश शिंदे, निंभोरा पोलिश स्टॉप,व जळगाव येथुन आर,सी,पी,चे दंगा पथक यांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला.या गुंह्याचा पुढील तपास उप विभागिय पो.अधिकारी नरेंद्र पिंगळे,व निंभोरा पो.स्टेशन चे उप निरीक्षक योगेश शिंदे करीत आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांचे शांततेचे आवाहन
धामोडी गावात सर्वांनी शांतता राखावी एकमेका बद्दल समज गैरसमज काढून घ्यावे असे आवाहन केले .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा