Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १० मे, २०२०
Home
/
Unlabelled
/
युवासेना विभाग प्रमुख तुषार कचरे यांच्या मागणीला यश ...!! तरुण गर्जना बातमीचा परिणाम
युवासेना विभाग प्रमुख तुषार कचरे यांच्या मागणीला यश ...!! तरुण गर्जना बातमीचा परिणाम
खिर्डी प्रतिनिधी: कोरोना महामारीचा विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये व सुरक्षेच्या कारणास्तव युवासेना विभाग प्रमुख तुषार कचरे यांनी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदनाच्या माध्यमातून प्रथम व द्वितीय वर्षांतील विद्यार्थ्यांना मागील सत्रातील सरासरी मार्क देऊन पास करण्यात यावे व शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना होम असायमेंट देऊन त्यांनाही पदवी द्यावी ...!!
अशी मागणी निवेदनाद्वारे 18 एप्रिल रोजी करण्यात आली होती...!
निवेदनाद्वारे दिलेल्या मागण्यांची दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रथम व द्वितीय वर्षाच्या होणाऱ्या परीक्षा रद्द केल्या आहेत तर शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा जुलै महिन्यात होणार असल्याची माहिती माननीय मंत्री महोदयांनी दिली आहे.....!!
त्यामुळे कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र राज्यातील चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता ,उद्याच्या भारताचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित जोपासत , विद्यार्थीवर्गाची भावना लक्षात घेत होणाऱ्या परिक्षांबाबत विद्यार्थ्यांना येणाऱ्या सर्व अडचणींचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी मंत्री महोदयांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थीवर्गाला दिलासा दिल्या बद्दल माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत साहेब यांचे धन्यवाद व आभार युवासेना विभाग प्रमुख तुषार कचरे यांनी मानले आहेत..!!
दिलेल्या निवेदलाला यश मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी युवासेनेचे व त्यांचे सहकारी विवेक कोळी , निशिकांत पाटील , प्रतीक सोनार , पवन कचरे , अमेय आसेकर , वैभव चौधरी , दीपक कोळी, अक्षय धनगर व अक्षय मानकरे यांचे आभार मानले आहेत...!!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा