Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ८ मे, २०२०

भटाने गाव कोरोनामुक्त करण्याचा ग्रामपंचायतीचा संकल्प



शिरपूर प्रतिनिधी कोरोना विषाणू संसर्गित होऊ  नये या साठी भारत सरकारने देशव्यापी लॉकडाऊन केले असून या देशव्यापी लॉकडाऊन झाल्याने देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोणा व्हायरसला हद्दपार करण्  यासाठी तसेच जनतेत जनजागृती करण्यासाठी  ग्रामपंचायत भटाने सरपंच  मानिषाताई    पाटील ग्रा.पंचायत सदस्य ,ग्रा.पंचायत सदस्या सामाजिक कार्यकर्ते यांनी ग्रामपंचायत हद्द परिसरातील नागरिकांना मोफत सॕनिटायझयचे वाटप करून सामाजिक बांदिलकी जपली आहे. ग्रामपंचायतने जनजागृती करताना नागरिकांना सांगितले कि आपण सर्वानी मिळून कोरोना व्हायरस वर मात करण्यासाठी तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी  ग्रामपंचायत भटाने  मार्फत वेळोवेळी फवारणी करून शासनाकडून देण्यात आलेल्या  सूचनांचे पालन करून  आपण नागरिकांनी स्वछता राखणे फार आवश्यक आहे. 

आपण नियमित साबणाने अथवा सॕनिटायझरचा वारंवार वापर करून हात स्वच्छ निरजंतुक करावेत.गर्दी ठिकाणी जावूच नये घरातच राहील्याने, आरोग्य विभागाद्वारे देण्यात आलेल्या सुचनानचे पालन केल्यास कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही.शासनाच्या नियमानुसार आरोग्याच्या दृष्ट्या पालन करणे .कोरोना व्हायरस बाबतीत मनात कोणतीही भीती न बालगता शासनाने दिलेल्या माहिती द्वारेच आपण आपली स्वतःची व कुटुंबातील माणसांची काळजी घेऊन कोरोना व्हायरसला समुळ नष्ट करण्यासाठी दुदरे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत हद्दीत जनजागृती केली. या वेळी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्यानी ग्रामस्थाना सांगितले कि आपण सारे जन  शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुयात.आपण स्वतः सुरक्षित राहू कुंटुबाला सुरक्षित ठेऊ, शासनाच्या नियमाप्रमाणे आपण पालन केल्यास आपण ,आपला परिसर,राज्य तसेच देश सुरक्षित राहील अश्या स्वरुपात जनजागृती करत नागरिकांना हात जोडात नमस्कार करत हस्त आंदोलन टाळा सुरक्षित रहा.शासनाच्या नियमाप्रमाणे वागा असे नागरिकांना सांगितले आपण सारे घरातच थांबू व सुरक्षित राहू असे  नागरिकांना ग्रामपंचायतीने आवाहन करत सांगितले कि कोरोना व्हायरसने संपुर्ण  विश्वातील देशात थैमाण घातले असून कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. कोरोना व्हायरस संपुष्टात येईपर्यंत आपण नागरिकांनी गर्दी च्या ठिकाणी जाऊच नये तसेच गर्दी होणार नाही याची ही आपण घबरदारी घेऊ. 

ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी या कठीण परिस्थितीत घाबरून न जाता आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. तसेच शासन वेळो वेळी करत असलेल्या सुचनानचे पालन आपण काटेकोरपणे करावे.सर्वानी घरातच थांबून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी घरातच थांबत शासनास सहकार्य करत कोरोनाला समुल नष्ट करसाठी ग्रामपंचायत सरपंच मनीषा पाटील ,उपरपंच,सदस्या पोलीस पाटील  ,सामाजिक कार्यकर्ते  अंगणवाडी व आशावर्कर  च्या वतीने ग्रामपंचायत हद्दीत सॕनिटायझरचे मोफत वाटप करत जनजागृती करण्यात आली.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध