Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ मे, २०२०

पातोंडा ग्राम पंचायतीत लिपिक पदाच्या भरतीत कोरोनाच्या संचार बंदीचा फज्जा


अमळनेर i प्रतिनिधी शिवाजी पारधी .

  • महिला सदस्या पतींचा भरतीत हस्तक्षेप
  • सदर भरती मेरिट पध्दतीने न झाल्याचा सदस्यांनी केला आरोप
  •  पात्र उमेदवाराना डावलुन पदभरती केल्याचा आरोप
  • सभा सुरू होण्याच्या आधी ग्रामस्थांनी केला जमावबंदीचा फज्जा.

 पातोंडा (अमळनेर) येथील ग्राम पंचायतीची मासिक सभा ग्राम पंचायत लिपिक पदाच्या  भरतीवरून गाजली.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील मार्च महिन्याची मासिक सभा रद्द झाल्याने सदर रद्द झालेली सभा गुरुवार रोजी ग्राम पंचायतीच्या कार्यालयात झाली. येथील लिपिक कम कारकून पद चार पाच वर्षापासून रिक्त असून सदर पदाची कामे निवृत्त लिपिक हिरामण पाटील काम बघत होते.पण त्यांच्या वयोवृद्धामुळे व कामाच्या व्याप्तीमुळे कामाचा बोजा वाढत होता. सदर पद भरणेकामी गावात चौकचौकात जाहिरात प्रसिद्ध केली.पोस्टाद्वारे एकूण १२ अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी ५अर्ज विलंब व इतर कारणाने अपात्र करण्यात आले होते.

मासिक सभेला ग्रामसेवकच उशिरा आले. सभेच्या सुरवातीलाच ग्रामस्थांनी ग्राम पंचायत कार्यालयात येऊन जमावबंदीचा फज्जा उडवला. सामाजिक अंतराचे भान न ठेवता ग्रामस्थांनी तोंडावर मास्क न लावता कार्यालयात येऊन जमाव केला. शेवटी जमावाला पांगवून सभेला सुरवात करण्यात आली.

विषय अजेंड्यावर आला असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या संचारबंदीत सदर विषयावर गावात वाद होतील. त्यामुळे गावातील वातावरण बिघडू शकते म्हणून सदर विषय हा कोरोनाचे संकट संपल्यावर घेण्यात यावा असे ठरविले मात्र काही सदस्यांनी आपला वशिलेबाजीचा उमेदवार भरावा असा जोर करून विषयावर चर्चा केली. त्यावर चर्चा होऊन पात्र असलेल्या ७उमेदवारांची गुणतालिका व मेरिट पद्धतीने निवड न करता ८ सदस्यांनी चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या उमेदवाराचे नाव सुचवून गैरपध्दतीने अक्षय पवार या उमेदवाराला बहुमत सादर करून निवड झाली असल्याचे सांगितले .

सदस्यांनी त्या उमेदवाराची निवड गुणांची टक्केवारी न बघता कोणत्या निकषांच्या आधारे केली ? सदर प्रक्रियेस सागर मोरे, गजानन बिरारी व भुरा संदानशिव या सदस्यांनी प्रखर विरोध दर्शविला. या भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या गुणांची व मेरिटची पाहणी न करता पात्र असलेल्या उमेदवारांवराना डावलून त्या आठ सदस्यांनी अन्याय केल्याचे इतर उमेदवारांनी सांगितले.  सभेतील पदभरती व कोरोनाच्या उपाययोजना हे दोन विषय सोडून अजेंड्यातील इतर विषयांना बगल देऊन सदस्यांनी पोबारा केला व ग्रामसेवकांनी ही सभा अर्ध्यात गुंडाळून ठेवली. सदर केलेली पदभरती ही कोणतीच परीक्षा न घेता, कोणतीच पात्रता, व गुण तालिका न बघता वशिलेबाजीच्या जोरावर कविता यादव, शितल पाटील, सुनीता संदानशिव, रिता पारधी,मनिषा बिरारी,हर्षल पवार,ऋषिकेश पवार आदी आठ सदस्यांनी चूकीच्या उमेदवाराची निवड करून पदाचा गैरवापर केला असल्याचे इतर उमेदवारानी सांगितले.

तशी  तक्रार त्यांनी लागलीच ग्रामसेवक यांच्याकडे केली असून सदर भरती प्रक्रिया चुकीची व अवैद्य असून ती रद्द करून वरील प्रशासकीय पातळीवर नवीन जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया नवीन करावी असे निवेदन दिले. सदर निवेदनावर नितीन पारधी, सुनील पारधी, अविनाश वानखेडे, आनंदा संदानशिवन,मुरलीधर बिरारी, नितीन पाटील व इतर युवकांच्या सह्या होत्या. सदर भरती प्रक्रिया रद्द होण्याकरिता गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले.

भरती प्रक्रियेत उपसरपंच यांनी तटस्थ भूमिका बजावली.

पातोंडा येथील आठ ग्राम पंचायत सदस्या ह्या महिला असून काही महिला सदस्यांच्या पतीवर्गानी मासिक सभेत येऊन हस्तक्षेप केला. त्यास सदस्य सागर मोरे यांनी हरकत घेतली असता ग्रामसेवक,सरपंच व उपसरपंचांनी चुप्पी साधली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध