Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २ मे, २०२०
श्री संत सखाराम महाराज रथाची प्रतिकृती ऑस्ट्रेलियात
पंकज पाटील,तरुण गर्जना : आपली मातृभूमी
सोडून गेलेल्या व्यक्तीला आपल्या देशाची, आपल्या गावाची, आपल्या मातीची
तीव्र ओढ असते; याची कितीतरी
उदाहरणे देता येतील. परदेशात स्थायिक झाले तरी मराठी संस्कृती टिकून ठेवावी, आपल्या परंपरेशी तेथे वाढणाऱ्या नवीन पिढीची नाळ जोडली जावी
यासाठी अशा कुटुंबाचा नेहमी प्रयत्न असतो.
यापैकी काही नावे आपल्या अमळनेरमधील असतील तर नक्कीच अभिमानाची गोष्ट. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात मागील १०
वर्षापेक्षा अधिक काळापासून वास्तव्यास असणारे श्री.
भुषण व डॉ. श्री.दर्पण शिदीड हे बंधूद्वयी आणि
त्यांच्या साथीला दहिवदचे श्री. प्रसाद पाटील हे त्रिकूट त्यापैकीच एक.
मूळचे अमळनेर येथील आणि गेल्या दशकापासून ऑस्ट्रेलियात स्थलांतरीत झालेले हे
त्रिकूट महाराष्ट्रीयन सण मेलबर्न येथे मोठ्या उत्साहात साजरे करत असले तरी
महाराष्ट्रातील आणि मुख्यतः खान्देशातील सण-वार, त्याकाळातले धार्मिक वातावरण हे कायम आठवत असतात.
अक्षयतृतीयेला सुरु होणारी बोरी नदीच्या पात्रात भरणारी
श्री संत सखाराम महाराज यात्रा म्हणजे अमळनेर शहराची धार्मिक आणि ऐतिहासिक
वैभव असलेला सोहळा... अमळनेर येथील वास्तव्यातील या यात्रेच्या आठवणी या
त्रिकुटाच्या मनात घर करून राहिल्यात. आणि
त्या आठवणीना उजाळा म्हणून श्री संत सखाराम महाराज यात्रेचा रथ बनविण्याची
संकल्पना या त्रिकुटाच्या मनात आली. त्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी 3D प्रिंटींगक्षेत्रात संशोधन करीत असलेल्या डॉ. श्री. दर्पण
शिदीड यांनी कंबर कसली.
मेलबर्न येथील नामांकित विद्यापीठातून विद्यावाचस्पती (पीएचडी) ही पदवी मिळविल्यानंतर
डॉ. दर्पण शिदीड कॅन्सर पीडित लोकांसाठी
वापरता येईल अशा अवयव रोपणावर (Body Implant) सध्या संशोधन करत आहेत. ३D प्रिंटिंगच्या क्षेत्रात
त्यांचे काही patents देखील आहेत आणि त्यांचे लेख आणि प्रबंध नेहमी आंतरराष्ट्रीय
माध्यमांमध्ये प्रकाशित होत असतात. भारतीय संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या विविध
वस्तू डॉ. शिदीड हे स्वतः ३डी प्रिंटिंग तंत्राद्यानाच्या
साहाय्याने पर्यावरणास अनुकूल अशा सामग्रीपासून बनवून श्री प्रसाद पाटील यांच्या साथीने 'भारतीय संस्कृती' या नावाने येथील भारतीय समुदायास वाजवी किमतीत उपलब्ध करून
देतात ; आपला छंद
जोपासतात आणि आपल्या परीने संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करतात.
३D प्रिंटिंग तंत्रज्ञान
वापरून श्री सखाराम महाराज रथाची रचना/आराखडा (Design) डॉ. श्री. दर्पण शिदीड यांनी स्वतः तयार केला आणि लॉकडाऊन च्या काळात रथ घरीच
बनविला . सर्वप्रथम श्री संत सखाराम
महाराज रथाचे विविध छायाचित्रे आणि चलचित्रे पाहून संगणकावर याची रचना केली.
रथाच्या विविध भागांचे प्रमाण आणि त्याचे मोज-माप याकडे खास करून बारकाईने लक्ष
दिले असून हा रथ पर्यावरणाची काळजी घेऊन म्हणजेच पर्यावरणास अनुकूल अशा
सामग्रीपासून ( (मक्याच्या स्टार्च) पासून बनविला आहे. श्री संत सखाराम महाराज रथाची हुबेहूब प्रतिकृती निर्मिली
जावी यासाठी यातील विविध भागांच्या बारकाईवर डॉ. शिदीड यांनी विशेष लक्ष केंद्रित
केले आणि त्यामुळेच याच्या उत्पादनासाठी तब्बल २ आठवडे इतका काळ लागला. आज हा रथ
पूर्णपणे सज्ज झाला आहे आणि त्याच्या निर्मितीचे समाधान डॉ. शिदीड यांच्या
चेहऱ्यावर आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा