Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ मे, २०२०
(माझे प्रवास वर्णन भाग १) "ही पाहिलेली स्वर्गीय पहाट"...
प्र+वास - म्हणजे प्रवास!! प्र-प्रस्थान करून आपण जिथे निवासास थांबतो .... त्याला प्रवास असं म्हणतात . प्रवास घडणं व प्रवास मुद्दाम हून करणं ह्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत असं मला वाटतं . त्याहूनही प्रवास करायला आवडणं यापेक्षा प्रवासाचा योग लाभणं हा खरंतर सुवर्णयोग म्हणावा लागेल .
असे अनेक प्रवास आपल्या आयुष्यात आपण करत असतो . छोटे-मोठे, देश-विदेश दौरे कळत नकळत घडतं असतात .
पण आज मी तुम्हाला त्या जादुई प्रवासाचं वर्णन सांगणार आहे..
जिथे जाण्यासाठी प्रत्येक मनुष्य स्वप्नवत जगत असतो.
आपल्या भारतभूमीचा मुकूट म्हणजे " हिमालय दर्शन" मी आपणास मी माझ्या शब्दाने घडवून आणणार आहे .....
तर मग चला माझ्यासोबत प्रत्यक्ष देवभूमीत....
साधारण 2011 चा तो प्रवास. मुंबई ते दिल्ली विमान प्रवासानंतर दिल्ली ते लेह असा परत विमान प्रवास. सकाळ ची 5 वाजता ची फ्लाईट बरोबर वेळेवर निघाली. विमानाने टेक ऑफ केलं.
एअर हॉस्टेस ने announce केलं एक तास वीस मिनिटांचा प्रवास आहे. त्यावेळी वाटलं कधी संपेल हा तास.
विमान बरचं रिकामचं होतं. निम्मे तर भारतीय जवानच होते. व निम्मे टुरिस्ट. आम्ही पुढे असल्याने सगळं रिकामं तर होतचं पण दोन्ही खिडक्यातून बाहेर चं बरचसं दिसतं होतं. Indian army चे जवान इतक्या मोठ्या संख्येने असल्याचा एक proud feel वाटतं होतं
दिल्ली जरा पहावी म्हटलं तर ती मेट्रो सिटी किती अजब प्रदुषणाच्या धुक्यात जगते हे त्यावेळी समजलं.
नाश्ता पाणी होतो तेचं आमचं विमान एका कमालीच्या उंचीवर येऊन पोचले आहे ह्या ची जाणीव झाली. अचानक विमान एका थंडगार वातावरणात आल्याच स्पष्ट जाणवलं.
विमानात एकदम लख्ख पांढरा शुभ्र प्रकाश पडला. आणी लोकं इतकं काय बघताहेत म्हणून खिडकीतून पाहिलं व एकदम ओरडलेच.airhostess व आमचे जवान ही माझा उतावीळ पणा पाहून थोडे गालातल्या गालात हसलेच.
पण प्रत्यक्ष देवभूमी पाहते आहे. असा मला भास झाला. पहिलाच तोंडातून शब्द निघाला व तो म्हणजे "स्वर्ग".
अंथाग व अगणित अश्या बर्फाच्छादित पर्वतरांगा माझ्या नजरेच्या ही कितीतरी पुढे पसरलेल्या होत्या. जणू लगेच माझं मनं त्या छोट्या छोट्या दिसणाऱ्या त्या पर्वतावरून एकेक पाय टाकतं नाचतं होतं. हे असे बर्फाच्छादित पर्वत मी फक्त सिनेमात पाहिले होते.
थोड्याच क्षणात आकाशात सोनेरी पिवळसर आभा दिसू लागली.
सहप्रवासी कमरेचा आपल्या जमेल तेवढा काटकोन करून फोटो. Video shooting करण्याच्या नादात उघड्या डोळ्यांनी ती पहाट पहायला खरचं मुकले. हो मुकले असचं मी म्हणेन.
त्या पिवळ्या धम्मक अश्या आगीतून आईंच्या उदरातून तान्हं बाळ जसं जन्माला हळूहळू यावं तसा तो सुर्य बाहेर पडतं होता. नुकत्याच जन्मलेल्या व रक्तानं माखलेल्या निरागसं व शांत बाळासारखा तो लाल लाल बुंद सुर्य जणू कोणीही हातात सहज उचलून घ्यावा.
पर्वतांच्या रांगा शांत, स्थिर, स्तब्ध व समाधी ला जणू बसलेत अशा जाणवत होत्या.
कुठे ही एक झाड नाही. घर, गावं, शहरं नाहीत. होते ते फक्त देहाला, चित्ताला, मनाला अगदी समाधी अवस्थेत नेणारे ते विलोभनीय पर्वत.
हा इंद्राचा दरबार पाहून जणू माझ्या मनात असंख्य अशी कल्पनेची फुलं एकदम उमलून आलीत. व त्यातील एकेक फूल मी त्या "स्वर्गीय पहाटेला वहात होते.
एका क्षणी तर असं वाटलं की इंद्र देवांनी दरवाजा उघडला व पाहतो तो काय चांदीचे चमचमणारे डोंगर, सोनेरी आभाळ, माणिक रत्नासारखा सुर्य.
हळूहळू आमचं विमान landing च्या दिशेने जाऊ लागले. तेव्हा ते छोटे छोटे पर्वत अगदी स्पष्ट व मोठेमोठे दिसू लागले. जणू तोंड निमुळत करून आमच्याकडे पाहून आम्हाला आपला परीचयचं देत होते.
आम्ही ती पहाट पाहण्यात वेडे झालो होतो व आमचे जवान आमच्या चेहर्यावरची कधीच न पुसली जाणारी ती पहाट पाहण्यात गुंग होते.
खरचं स्वर्ग आहे का? व जर असलाच तर कसा असेल? तर मी बिनदिक्कत उत्तर देईन की स्वर्ग हाच व असाच असतो. हिमालयाच्या कुशीत वसलेला स्वर्ग.
ते स्वर्गीय सौंदर्य पाहून नकळत डोळ्यातून आनंदाश्रू केव्हा गळाले समजलचं नाही.
आत्मिक शांतीचे सौंदर्य पाहून मनाला एक खात्री नक्की झाली व ती म्हणजे इथे फक्त शंकर पार्वतींचाच नव्हे तर पुर्ण आपल्या 33 कोटीं देवाचां निवास ह्या भूमीत नक्की आहे.
अजूनही माझे शब्दच अपुरे पडताहेत. असं वाटतं.
पण मी स्वतःला खूप नशीबवान समजते की अगदी त्या पुष्पक विमानातून सुरेख व सुंदर हिमालय मला पहायला मिळाला. अगदी मी म्हणेन मी सुर्याचा जन्म पाहिला. त्याच जन्म स्थान मी पाहिलं. आणि काय हवं?
त्या पहाटेचा एक ही फोटो आज माझ्या कडे नाही आहे. पण डोळ्यांच्या हजारो पटलात तो सुर्य व ती सुवर्णमयी पहाट रोज नव्याने माझ्या मनात उगवतेच आहे. उगवतेच आहे.
(पुढील भागात तिथे मी जे भौगोलिक वातावरण अनुभवलं त्याविषयी मी आपल्याला सांगणार आहे.)
लेखिका सुजाता पाटील अणुशक्तीनगर मुंबई.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा