Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ४ मे, २०२०

अमळनेर मध्ये ज्या महिलेवर झाला होता गुन्हा दाखल त्याच महिलेवर नगर मध्ये ही गुन्हा




तरुण गर्जना  ,४ मे २०२०  :-  पोलिस असल्याची तोतयागिरी करणाऱ्या केडगावच्या महिलेविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शबनम मोमीन ऊर्फ समीना गफूर मोमीन (रा. केडगाव देवीमंदिरामागे, केडगाव) हिच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वीच अंमळनेर पोलिस ठाण्यात ज्योती भोई यांनी  गुन्हा दाखल केला होता. आता नगरलाही तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत माहिती अशी की, शबनम मोमीन उर्फ समीना हिने फेसबुकवर पोलिसांचा गणवेश घातल्याचे फोटो अपलोड केले आहेत.
तिने फेसबुकवरील प्रोफाईलमध्ये महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असल्याचा दावा केला होता.पोलिस नसताही पोलिस असल्याची तोतयागिरी केल्याने पोलीस कर्मचारी तन्वीर शेख याने शबनम मोमीन हिच्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून तिच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १४०, १७०, १७१, ४१९, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम २००० चे कलम ६६ डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध