Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ मे, २०२०
डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्यात आग; दोन ते तीन तासांनी नियंत्रण
नंदुरबार प्रतिनिधी नवापुर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्यात आज रविवारी दुपारी अचानक आग लागल्याने खळबळ उडाली.धुमसणाऱ्या आगीवर तब्बल दोन तासांनी नियंत्रण मिळविण्यात यश आले.
डोकारे ता. नवापूर येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्यात लागलेल्या आगीची वार्ता कळाल्यानंतर गावातील नागरिक तात्काळ मदतीसाठी धावून आले. कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील शर्तीचे प्रयत्न करीत आग विजवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली.
कारखान्याच्या बाहेरील बाजुचे नुकसान झाले आहे. नवापुर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबाद्वारे दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा