Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ६ मे, २०२०
Home
/
Unlabelled
/
मुस्लीम बांधवाचे घरातूनच नमाज व तराविहाचे पठन फळे , खजूरची कमतरता लोकडाऊनमुळे उपवासाच्या पदार्थाचे घरातच तयारी .
मुस्लीम बांधवाचे घरातूनच नमाज व तराविहाचे पठन फळे , खजूरची कमतरता लोकडाऊनमुळे उपवासाच्या पदार्थाचे घरातच तयारी .
बी. एस. मण्यार (प्रतिनिधी) तोरखेडा ता. शहादा. लोकडाऊनमुळे जिल्हायासह तोरखेडा वडाळी व सारंगखेडा परिसरात मुस्लीम समाज बांधव मशिदीत न जाता
घरातूनच नमाज पठाण करण्याची आयुष्यातील ही पहिलीच वेळ असल्याचे समाजातील वयोवृध्द सागंत आहेत
रमजान निमित्त आठ ते दहा वर्षापासून ते वयोवृध्दापंर्यत उपवास (रोज) धरतात ३० दिवसाचे रोजे पाळले जातात पहाटे चार वाजे दरम्यान सहेरी करून उपवासाला सुरुवात केली जाते. दिवसभर अन्नाचा कण आणि पाण्याचा थेब हि नघेता सायकळी सात वाजेदरम्यान पेंडखजूर फळे खाऊन उपवास सोडली जातो पवित्र रमजान महिण्याला सुरुवात होताच विविध प्रकारच्या फळांनी व परदेशातून पेंडखजूरने फुलते मात्र यावर्षी कोरोन विषाणूच्या प्रादुर्भावाचा पाश्वभूमीवर संचारबंदीमुळे परिसरातील फळाची दुकाने बंद आहेत परिणामी मुस्लीम बांधव घराच्या घरीच पदार्थ तयार करून उपवास सोडत आहेत
मुस्लीम समाज बांधावा कडून प्रशासनाला नेहमीच सहकार्य मिळते सध्याच्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर हि परंपरा कायमठेवली आहे. मुस्लीम समाजबांधव मशिदीमध्ये गर्दी टाळून घरातच पाच वेळची नमाज व ताराविहची नमाज घरातूनच पठन करत आहे . – मूबल्लिक मुक्तार भाई शहादा बाजारात पेठेत खुजराचीही कमतरता उपवास सोडण्यासाठी मुस्लीम समाजात पेंडखजूरला विषेश महत्व आहे परंतु बाजारात पाहिजे तशी पेंडखजूर उपलब्ध नाही. इराक, इराण आदी देशातून मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचा खजूर भारतात विक्रीसाठी येतात . मात्र जगावर कोरोनाचे सावट असल्याने यंदा प्रथमच आखाती देशातून खजूर आलेली नाही त्यामुळे ग्रामीण भागात काही ठिकाणी खजुरविना उपवास (रोजा) सोडावा लागत आहे पहिल्यादाच अशी वेळ आली असल्याचे समाजातील वृध्दानी सागितले .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा