Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ५ मे, २०२०
Home
/
Unlabelled
/
अंनिसचे कार्यकर्ते मेघराज गायकवाड यांच्या एक महिन्याचा मानधनातून किराणा किट वाटप
अंनिसचे कार्यकर्ते मेघराज गायकवाड यांच्या एक महिन्याचा मानधनातून किराणा किट वाटप
अहमदपूर:प्रतिनिधी गजानन आनंतवाळ सध्या जगासह भारतामध्ये ही कोरोना संसर्गाने धुमाकुळ घातला या संसर्गाला रोकण्यासाठी शासनाने पूर्ण देशामध्ये लॉक डाऊन केले असल्यामूळे छोटेमोठे उद्योगधंदे, शाळा, महाविद्यालय, वाहतूक व्यवस्था, बाजारपेठा पूर्ण ४8 दिवसासाठी लॉक डाऊन केल्यामूळे मजूरांच्या हाताला रोजगार मिळत नाही तसेच विद्यार्थी, मजूर लोक कामाच्या ठिकाणीच अडकून पडले आहेत. त्यांचे हाल होत असल्यामूळे अनेक सेवाभावी संस्था, ट्रस्ट, व्यावसायीक प्रतिष्ठान, सामाजीक प्रतिष्ठाण तसेच सामाजीक क्षेत्रात काम करणारे समाजसेवक,व्यावसायीक, उद्योगपती शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवा,
अन्नधान्य वाटप करुन माणूसकी अजून शिल्लक असल्याचे दाखवून देत आहेत.
सविस्तर माहिती अशी की, येथील अंधश्रध्दा निर्मूलन समिती तिचे कार्यकर्ते म्हणून मेघराज गायकवाड गेल्या वीस वर्षापासून ,शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत काम करत, आहे, ते येथील पोस्ट कार्यालयात खातेबाह्य टपाल कर्मचारी गेली 25 वर्षापासून काम करातात ,6 माणसाचं कुटुंबाचे पालन पोषण त्यांच्या एकट्यावर असून ,एक कन्या इंजिनियर ,दुसरी कन्या वकील ,तर मुलगा मायक्रो बीएससी शिक्षण घेतअसून ,साधी राहणी उच्च विचार या म्हणीप्रमाणे कुटुंब चालवण्यासाठी जास्त पैसा लागत नाही, शासनाला निधी न पाठवता आपण ज्या गावी राहतो त्याच ठिकाणी अनेक कुटुंबा वर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांनाच थोडीफार मदत करण्यासाठी म्हणूनच यावर्षी या जागतिक महामारी संकटात आपलंही समाजासाठी राष्ट्रहितासाठी आपले काहीतरी योगदान असावे, यापूर्वी पती-पत्नीने आपल्या वाढदिवसानिमित्त देहदानाचा संकल्प केलेला आहे, मला महिन्याला मिळणारा मानधन 14931 रु मिळातो ,त्यातून परिवारच्या खर्चतून बचत करुन, ते आपल्या एक महिन्याचा मानधनातून तब्बल 10 970 रुपये एवढ्या रकमेची किराणा किट गरजू लोकांपर्यंत घरपोच वाटप करीत आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी व समाजाच्या विकासासाठी सतत अंनिस ही प्रयत्नशिल संघटना आहे. त्यामूळे गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण बाजारपेठा बंद असल्यामूळे यात अहमदपूर शहरामध्ये परराज्यातील तसेच पर जिल्ह्याह्यातील लोक अडकुन पडले असल्यामूळे मजुरांच्या हाताला काम नाही त्यांची उपासमार होऊ नये यासाठी अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने 60 गरजू कुटुंबीयांना धान्य वाटप करण्यात आले आहे.तसेच स्वतः मेघराज गायकवाड यांच्या वतीने एक महिन्या चे मानधन गरजूवंताना अन्नधान्य वाटप करीत आहेत. या सामाजिक कार्यातून खूप मोठे समाधान मिळते असे त्यांचे मत आहे, आपण सर्वजण जगलो तर पैसा पुना कामवता येईल
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा