Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ५ मे, २०२०

शेगांव नवोदयच्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राजस्थानला बस रवाना



शेगांव (प्रतिनिधी)-लॉकडाऊनपूर्वी शेगांव येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे २१ विद्यार्थी हिमाचल प्रदेश मध्ये अडकले होते त्यांना तेथील प्रशासनाने राजस्थानमधील कोटा पर्यंत आणून सोडले आहे . तेथून परत आणण्यासाठी प्रशासनामार्फत शेगांव आगाराची शिवशाही बस क्र . एम एच ०६ बी . डब्लू ३५६२ ही ४ मे रोजी दुपारी १२ . ३० बा . दरम्यान रवाना करण्यात आली . यावेळी आगारव्यवस्थापक सुभाष भिवटे यांनी बसचे पूजन केले . तर उपस्थीत कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत बस घऊन गलल्या दान चालकाच टाळ्या वाजवून स्वागत केले . 

या विद्यार्थ्यांना घरी परत पाठवण्याची विशेष व्यवस्था करण्याचे निर्देश या राज्यातील संबंधीतांना द्यावे अशा मागणीचे पत्र बुलडाणा जिल्हयाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २५ एप्रिल रोजी पाठवले होते हे येथे उल्लेखनीय शेगांव येथून पाठवण्यात आलेल्या या आसनी शिवशाही बसमध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे उद्देशाने सुरक्षिततेची पूर्णतः काळजी शेगाव आगाराकडून घेण्यात आली . सदर बस निर्जंतुकीकरणासाठी शेगाव डेपोत सॅनेटायझर फवारणी करण्यात आली . 

तसेच या बसवरील चालक मंगुसींग आडे व दुसरे चालक शिवाजी दुबे यांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली .
याप्रसंगी आगार अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

ही बस ६ मे रोजी मध्यरात्री १२ वा . दरम्यान या विद्यार्थ्यांना घेवून शेगावला परतणार आहे .

चौकट-

केंद्रशासनाच्या मायग्रेशन योजना १९ - २० अंतर्गत हिमाचल प्रदेश असे अडकलेत विद्यार्थी अस अडकलतावद्याथा राज्यातील चंबा जिल्हयात सारोल नवोदय विद्यालय या ठिकाणी शेगाव येथील नवोदय विद्यालयातील नवव्या वर्गाचे एकूण २१ विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले होत . २५ मार्च रोजी त्यांचे सत्र संपून परत येण्याच्या तयारीत होते मात्र २२ मार्चनंतर लॉकडाऊन जाहीर झाल्याने सदर विद्यार्थी त्याचठिकाणी अडकले आहेत . त्यामळे ज्याप्रमाणे कोटा येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेश , छत्तीसगड , मध्यप्रदेश या ठिकाणी राज्य सरकारकडन स्वतंत्र बसद्वारे पाठवण्याची व्यवस्था केली गेली . त्या प्रमाणे या विद्यार्थ्यांनाघरीपरत पाठवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी पत्राद्वारे खासदार जाधव यांनी नुकतीच पंतप्रधान मोदी यांना केली होती . त्यामुळे शासनाने सदर विद्यार्थ्यांना घरी आणण्यासाठी ही विशेष व्यवस्था केली आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध