Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २ मे, २०२०
परतुरात भर वस्तीत कोरोना रूग्ण आढळल्याने खळबळ !
तो रूग्ण सातोन्याचा - शहरात संचारबदी अधीकचं कडक – 25 नातेवाईकांना कोरइंटाईन
परतुर प्रतिनिधी परतुर शहर कारोना मुक्तीच्या उबंरढयावर असताना काल 1 मे रोजी रात्री उशिरा जिल्हयात कोरोनाचे पाच रूग्ण पोजिटीव आढळले व त्यातील एक रूग्ण परतुर शहरातील भर व्यस्तीत सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परतुर व परिसरात अधीकंच कडक बदोबस्त करण्यात आला आहे व परीसरातील सर्व सिमा सिल करत रूग्णाच्या संर्पकातील परतूर – सातोनाच्या 25 नातेवाईकांना कोरांइन्टाईन करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे .
या बाबत माहिती देतांना डॉ.ज्ञानेश्वर नवल यांनी म्हटले की , दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी एका अज्ञानाताकडुन फोन वर माहिती कळाली की परतुर शहरातील पोलीस स्टेशन समोरच्या अक्षय नगर भागात एका रूग्णवाईकेत पाच संशीयत लोक आले आहेत. हि माहिती कळतांच तातडीने आपण यांची माहिती पोलीस प्रशाषनाला दिली असल्याची त्यांनी दिला याबात गोपनीय शाखेचे प्रल्हाद गुंजकर यांनी माहिती देताना सागीतले असता सदरील केएचबीआर मिळताच आय एस. अधीकारी निलेश तांबे पोलीस ताफयासह सबंधीत ठिकणी आम्ही गेलो असता एब्लस क्रमाक एमएच 1 – बीएक्स 0340 या वाहनातून सदरील पाच व एक चालक असे सहा जन मुबई येथील हॉट शोप्ट मधून या ठिकाणी आल्याचे आढळून आले या सर्वांना तातक्काळ ताब्यात घेत परतूर ग्रामीण रुग्णालयात तपासणी साठी पाठवले व तेथून जालना सिविल मध्ये सईयब रिपोर्ट साठी घालवण्यात आले . या सर्वाचा अहवाह 1 मे रोजी रात्री उशिरा प्राप्त झाला असुन या पाच पैकी चार जण निव्हेटिव्ह व एक जाणाचा अहवाल प्वोजिटिव आला असल्याची माहिती त्यांनी दिली. या घटनेमुळे शहरात पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे आज शनिवारचा आठवडी बाजारही रदद करत ग्रामीण भागाकडुन शहरात येणारे सर्व मार्ग सिल करण्यात आले आहे. व सकाळपासुनचं शहरातील एकही दुकान चालु करण्यात आले नव्हते , या शिवाय बाहेरूण येणा-या दूधवाल्यांना शहरात येउ दिले नाही. शहरात व परीसरात कडक बदोबस्त ठेवण्यात आला असुन यात जिवनाष्यक वस्तुचे दुकाने ही कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. सदरील रूग्ण हा सातोना येथील रहवाशि असल्याचे कळते तो मुंबईहुन दिनांक 30 एप्रिल रोजी चार जनासह परतुर शहरात आपल्या नातेवाईकांच्या घरी अवैध्यरित्या आला होता.
मात्र शेजा-याच्या सर्तकतेमुळे यांची माहिती उजेडात आली व या पाच जनांना तितक्याच तातडीने पोलीस प्रशाषनाने त्याब्यात घेतले . परतुर शहरात हे संशीयत सायंकाळी 4 ते सकाळी 8 पर्यंत वास्तवात होते याता सदरील रुग्णाने मुबई ते सातोना व सातोना ते अक्षय नगर परतूर असा प्रवास केला आहे , यातील ईतर चार जन बिलाल कॉलनी परतूर ,बरडी पाण्याची टाकी परतूर या काळात ते तब्बल 25 जणांच्या संर्पकात आले होते . या सर्वांच्या घरी जाऊन पोलिस प्रशाहनाने त्यांना कोरइंटाईन करत घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत याच्यात काही लक्षणे आढळयास यांना रुग्णालयात भरती करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली
दरम्यान नातेवाईकांनी त्यांना या परस्तीतीत घरात प्रवेश का करू दिला असा संताप संतप्त सवाल उपस्तीत केल्या जात आहे. या घटनेमुळे शहरात भयानक शांतता पसरली असुन , सगळीकडे चिंतेत भर पडलेली दिसत आहे.
या ताब्यत घेतलेल्या या रुग्णाच्या 25 नातेवाईकांचा अहवाल काय येतो याकडे आता परतुरकरांचे लक्ष लागुन आहे. घरातच रहा बाहेर अजिबात पडू नका असे आहवण प्रशाशनाच्या वतीने करण्यात आले आहे .....
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा