Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २ मे, २०२०
Home
/
Unlabelled
/
कोरोनाच्या लढ्यात शिरपूरचे मुख्याधिकारीं अमोल बागुल यांच्या मातोश्री च्या स्मरणार्थ “उल्लेखनीय” मदत
कोरोनाच्या लढ्यात शिरपूरचे मुख्याधिकारीं अमोल बागुल यांच्या मातोश्री च्या स्मरणार्थ “उल्लेखनीय” मदत
शिरपूर न.प.चे मुख्याधिकारी अमोल बागूल यांच्या मातोश्री स्मृतीशेष मंदाकिनी प्रभाकर बागूल आणि भाचे स्मृतीशेष विश्वदीप पद्मपाणि यांच्या स्मरणार्थ ‘मंदप्रभा फाउंडेशन, नाशिक’ यांच्याकडून शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचा-यांना ५१ पी.पी.ई. कीट वाटप करण्यात आले.
यावेळी न.प चे मुख्याधिकारी अमोल बागुल बोलतांना म्हणाले आईचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले होते.
कोरोनाच्या संसर्ग मुळे नाशिक जाणे शक्य नाही.
आईने शिकवले की, संपूर्ण विश्व आपले कुटूंब आहे. यामुळे शिरपूर हे माझे कुटूंब आहे.आईच्या स्मृतीदिनी छोटेसे योगदान देण्याचा मानस होता.
कोरोनाच्या लढाईत खरे योध्दा म्हणून नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी लढत आहेत.त्यांंच्या स्वताची काळजी घेण्यासाठी हे पी.पी किट देत आहोत.हे पी.पी कीट इंदौर येथून मागण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापनाच्या संकट वेळी कुठल्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी नगरपालिका तयार आहेत.मंदप्रभा फाउंडेशन तर्फे कुटूंबातील सदस्यांना दिले आहे.
कोरोनाच्या विरूध्दात लढा देण्यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जात आहे.याच लढाईत न.प.चे मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या मातोश्री स्मृतीशेष मंदाकिनी प्रभाकर बागूल आणि भाचे स्मृतीशेष विश्वदीप पद्मपाणि यांच्या स्मरणार्थ ‘मंदप्रभा फाउंडेशन, नाशिक’ यांच्या मार्फत शिरपूर नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी यांच्या कार्यास अभिवादन करण्यासाठी मुख्याधिकारी अमोल बागुलमंदप्रभा फाउंडेशनच्या विश्वस्त डाॅ. सुनिता बागूल व शाल्व बागूल यांच्या हस्ते पी.पी.ई कीट वाटप करण्यात आले.
कोरोना प्रतिबंधक संघर्षात शिरपूर नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी आपली जबाबदारी निष्ठेने अविरत पार पाडत आहेत. त्यांच्या कार्यास अभिवादन आणि प्रोत्साहन म्हणून हा उपक्रम मंदप्रभा फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आला.
या कीट मध्ये फुल बाॅडी गाऊन, फुल हेड
अँँण्ड फेस कव्हर विथ गाॅगल, ग्लोव्हज, शुज कव्हर, मास्क यांचा समावेश आहे. प्रतिबंधक क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी यांना पी.पी.ई कीट वाटप करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा