Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ मे, २०२०
धुळे येथील आजीबाईने केले कोरोनावर मात,डाॕक्टरांनी केले अभिनंदन
तिघांसह हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून मिळाला डिस्जार्च
धुळे,प्रतिनिधी दि. 4 कोरोना विषाणूवर मात करीत धुळे जिल्ह्यातील चार रुग्ण आज सायंकाळी आपापल्या घरी परतले. त्यांना श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करीत निरोप देण्यात आला. यावेळी आमदार डॉ. फारुक शाह, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे डेडिकेटड कोविड हॉस्पिटल आहे. तसेच अतिदक्षता विभागही कार्यान्वित करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंत 32 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन रुग्णांवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. या रुग्णांपैकी दोन रुग्णांवर अतिदक्षता विभागात, तर उर्वरित 22 रुग्णांवर कोविड केअर सेंटरमधील सर्वसाधारण वॉर्डात उपचार सुरू आहेत.
या विभागात दाखल रुग्णांना 14 दिवस पूर्ण झाले. या कालावधीत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांची काल व आज कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली. या चाचणीचे अहवाल आज निगेटिव्ह आले. त्यामुळे या चौघांना आज सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला. या रुग्णांमध्ये शिंदखेडा तालुक्यातील 70 वर्षीय आजीबाईंचा, तर धुळे शहरातील तीन रुग्णांचा समावेश आहे.
धुळे शहरातील रुग्णांमध्ये दोन महिला व एका तरुणाचा समावेश आहे. त्यांना सायंकाळी टाळ्यांचा गजरात निरोप देण्यात आला. यावेळी आमदार डॉ. शाह, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामराजे, नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, अति विशेष अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, डॉ. निर्मल रवंदळे आदी उपस्थित होते.
कोरोना विषाणूपासून मुक्त झालेल्या रुग्णांनी यापुढेही काळजी घ्यावी. नागरिकांनीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे. नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. रामराजे यांनी यावेळी केले.
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, महसूल, बंदरे, खार विकास जमिनी, विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी श्री. यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक श्री. पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभाग दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज चार रुग्ण कोरोना मुक्त होवून घरी परतले आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा