Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ५ मे, २०२०

अमळनेरमध्ये वाईन शॉप समोर दे... दारू....दे दारू


दे... दारू....दे  दारू  करत अमळनेर मध्ये मदिरा भक्तांनी  दारूच्या दुकानासमोर तोबा गर्दी करत  अमळनेर कोरोना मुक्त आहे असे वातावरण तयार केले आहे . कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सशर्त दारू  विक्री करण्यासाठी शासनाने आदेश दिले आहेत.


पोलीस बंदोबस्त मध्ये दारू विक्री करण्यात येत असली तरी पोलीस प्रशासनाने पाठ फिरवताच दारूच्या दुकानासमोरील गर्दी सुरक्षित अंतर न ठेवता एकाच ठिकाणी जमा होवून  गर्दी करत असल्याचे चित्र अमळनेर मध्ये  वाईन शॉप समोर पहायला मिळत आहे .


अमळनेर तालुक्यात कोविड-१९ च्या पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना नागरिक  गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात आहे. त्यात दारू विक्री सुरु झाल्याने यापुढे आणखीनच बिकट परिस्थितीती निर्माण होईल अशी स्थिती दिसून येत आहे.
 

महाराष्ट्रात  दारू विक्री सुरु झाली असली तरी जे क्षेत्र रेड झोन मध्ये आहेत तिथे दारूचे दुकाने तूर्तास तरी बंद ठेवण्याची गरज होती .अशी मागणी अमळनेरच्या जनतेतून होत  आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध