Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २८ जून, २०२०

शेगावात काँगेस तर्फे ११ जणांचे रक्तदान..!



शेगाव प्रतिनिधी:शेगाव शहर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने साईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये एकूण ११ जणांनी रक्तदान केले आहे.

     
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये याकरिता कॉंग्रेस नेते विजय अंभोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान घेण्यात आले तर गोरगरीब जनतेला ७ क्विंटल धान्य वाटप करण्यात आले यामध्ये गहू, तांदूळ, साखर यासह जीवनावश्यक वस्तूंचा सहभाग आहे. यावेळी प्रदेश प्रतिनिधी दयारामभाऊ वानखडे, काँग्रेस पक्षनेत्या सौ.स्वातीताई वाकेकर, ज्ञानेश्वरदादा पाटिल, अल्पसंख्याक विभाग जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.असलम खान, शिवाजी बुरुंगले, दिपक स्लामपुरीया, अनु.जाती विभाग जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव गवई, शहराध्यक्ष भिकुभाऊ सारवन, युवक अध्यक्ष पवन पचेरवाल, रहीम खान, शिवा माळी, दिपक तायडे, सोनू सारवन, राम सारवन, करणं सारवन, रवी सारवन, सुरज सारवन, अविनाश सारवन, अमर कलोसे, विक्की सारवन, गणेश सारवन, राहुल सारवन, ईश्वर दांडगे, गोपाल भालेराव, विनायक तायडे, गजानन गवई यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन लक्ष्मण गवई तर आभार भिकू सारवन यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध