Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २८ जून, २०२०

शेगावात विद्युत बिलांची होळी..!



शेगाव प्रतिनिधी:स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात विद्युत ग्राहकांनी विद्युत बिलांची होळी करून महावितरण कंपनीचा निषेध केला,, शेगाव शहरातील अनेक विद्युत ग्राहकांना घरगुती वापराचे भरमसाठ बिल आलेले आहेत मार्च महिन्यापासून शेगाव शहरासह संपूर्ण भारतात लोक डाऊन व संचार बंदी मुळे सर्व व्यवहार ठप्प होते त्यामुळे व्यापारी व्यवसायिक उद्योजक याप्रमाणे मजूरवर्ग सुद्धा बेरोजगार झालेले आहेत आर्थिक संकटात सापडलेल्या शहरातील सामान्य व गरीब वर्गातील विद्युत ग्राहकांना विद्युत वीज वितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा बिल मिळाल्यामुळे विद्युत ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले दिसत होते एकीकडे लागल्यामुळे बंद पडलेली होती 

तर दुसरीकडे विद्युत मंडळाकडून  मनमानी पद्धतीने तीन महिन्याचे विज बिल वीज ग्राहकांना देण्यात आले याबाबत संबंधितांना सदर बाब लक्षात आणून देऊन सुद्धा कोणत्या पद्धतीची कारवाई करण्यात न आल्यामुळे शेगाव शहरातील विद्युत ग्राहकांच्या समस्या घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे शहराध्यक्ष शेखर नागपाल शेगाव संघर्ष समितीचे विजय मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात विद्युत बिलाची होळी करण्यात आली यावेळी वीज वितरण कंपनीचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचा व सोशल डिस्टंसिंग पालन करून करण्यात आलेल्या कार्यक्रमात गणेश उर्फ मुन्ना अवस्थी नंदू गणोरकर राजकुमार व्यास, काळू चौधरी ईश्वर सावना रितेश गणोरकर प्रदीप सावना ,देवानंद परियाल प्रमोद ताड ,गोपाल इंगळे  यांच्यासह अनेक नागरिक  सहभागी झाले होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध