Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २८ जून, २०२०
Home
/
Unlabelled
/
लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे ग्रामीण रुग्णालयाला वॉटर कुलर व वॉटर फिल्टरची भेट..!
लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे ग्रामीण रुग्णालयाला वॉटर कुलर व वॉटर फिल्टरची भेट..!
प्रतिनिधी अमळनेर: येथील लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे ग्रामीण रुग्णालय मध्ये येणाऱ्या सर्व रोग्यांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी पिण्याची व्यवस्था उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती लक्षात आल्यावर तत्काळ लायन्स क्लब अमळनेर तर्फे ग्रामीण रुग्णालय अमळनेरला वॉटरकुलर व वॉटरफिल्टर भेट देण्यात आले.
सदरच्या वॉटरकुलर व फिल्टर बसवण्यासाठी क्लबला एकूण 61000 चा खर्च आला असून सर्व खर्च लायन्स क्लबचे सदस्य सुनील लुनावत, एम एस जैन ग्रुप तर्फे करण्यात आला.
वॉटरकुलर व फिल्टरचे उद्घाटन आज आमदार अनिल पाटील व जि.प सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार अनिल पाटील यांचा सत्कार लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य डॉ.युसुफ पटेल यांच्या हस्ते करण्यात आला व जयश्री पाटील यांचा सत्कार लायन्स क्लबचे अध्यक्ष नीरज अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला, नंतर लायन्स सदस्य सुनील लुनावत यांचा सत्कार आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, कार्यक्रमाच्या शेवटी लायन्स क्लब तर्फे ग्रामीण रुग्णालयातील कोरोना योद्धा सर्व डॉक्टर्स व नर्सेस यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या वेळी ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ.ताडे, डॉ संदीप जोशी तसेच लायन्स क्लबचे पदाधिकारी बजरंग अग्रवाल, डॉ.युसुफ पटेल, येझदी भरूचा, योगेश मुंदडा, जितेंद्र जैन, पंकज मुंदडा, मिलिंद नवसारीकर, रवींद्र जैन, अनिल रायसोनी, सुशील पारेख, महेंद्र पाटील, महावीर पहाडे, चेतन जैन, प्रसन्ना पारेख, अजय हिंदुजा व ग्रामीण रुग्णालय सर्व कोरोना योद्धा स्टाफ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन्स
क्लबचे सेक्रेटरी प्रसन्ना पारेख यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा