Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २८ जून, २०२०

तोरखेड्यात कोरोनाचा शिरकाव-नागरिक भयभीत..!


संपूर्ण गाव कंटेंनमेंट क्षेत्र म्हणून घोषित कडक लॉकडाऊन जारी..!

  पाच दिवस  जनता कर्फ्यू
     
तोरखेडा प्रतिनिधी शाहादा तालुक्यातील तोरखेडा गावात  1 कोरोना रुग्ण आढळून आल्याने गावात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,नदुबार जिल्हात कोरोना विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना काल मिळालेल्या अहवालात पुन्हा नव्याने 58 रुग्णांची भर पडली त्यात नदुबार जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 792 पर्यंत जाऊन पोहचली,

त्याच दरम्यान तोरखेडा गावातील रुग्णाला हे लक्षणे जाणवल्याने त्यांना धुळे  जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,काल रात्री 10 वाजता आलेल्या अहवालात  1 रुग्णांचा स्वब नमुना  पॉझिटिव्ह आला आहे,संबंधित व्यक्तीच्या परिसरात जंतू नाशक फवारणी करण्यात आली.तसेच गावात 1कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने हे गाव कंटेनमेंट झोन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे,व संपूर्ण गावात कडक लॉकडाऊन जारी केला आहे,तसेच तोरखेडा गाव हे बाजारपेठेचे गाव असून आजू बाजूच्या परिसरातील 5 ते 8 गावातील नागरिक या गावाच्या दैनंदिन संपर्कात येत असतात,तसेच संबंधित व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आल्या असल्याने  सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे,सदर रुग्णांची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी राजेद्र पेढारकर ,गट विकास अधिकारी , कोविड कक्षा अधिकारी, किशोर खैरनार, प्रथमिक आरोग्य अधिकारी डाँ मोहने , मडळ अधिकारी विजय साळवे , तलाठी शशिकांत सावळे ,ग्रामविकास अधिकारी चेतन पाटिल,माजी प स सदस्य प्रियदरक्षण कदमंबाडे, पोलिसपाटील दयाराम चौधरी , सारंखेडा चे पोलिस निरीक्षक चद्रकांत सरोदे ग्रामपंचायत सदस्य कैलास सोनवने , दिपक चौधरी, व आशा वरकर व आरोग्य टीम  यांनी गावात भेट दिली,व आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत,
संपूर्ण गावातील गल्ल्या व वार्डच्या मुख्य सीमा बेरीगेट्स लावून बंद करण्यात आल्या आहेत,संपूर्ण गावात कडक बंदी  जारी केली असून,व्यावसायिक या बंद ला प्रतिसाद देत आहेत,

तसेच आजू बाजूच्या परिसरातील   तोरखेडा हिगणी हे गाव बफर झोन मध्ये करण्यात आले आहेत.गावातील कोरोना विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  व परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत असून,त्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता  तोंडाला मास्क लावावा.कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये,गर्दी करू नये.हाताला सॅनिटायझर लावावे,हात स्वच्छ धुवावे,स्वतःची व कुटूंबाची काळजी घ्यावी,व प्रशासनाला सहकार्य करावे, अशा सूचना गावातील सरपंच, उपसरपंच तलाठी  ग्रामविकास अधिकारी पोलिस पाटील आरोग्य अधिकारी  पदाधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाने दिल्या आहेत, 

तसेच ८ लोकाना कोरनटाईन करन्यात आले आहे  व तेवीस लोकाना होम कोरनटाईन करण्यात आले आहे  
  
 
हाँटेल चालकाने मास्क न लावल्यने गटविकास अधिकारी गोसावी यांनी पाचशे रू दडं ठोकल्यने ग्रामस्था मध्ये दिवसभर चर्चा रंगली होती
 
फोटो  -तोरखेडा (ता शाहादा )येथे कोरोना रुग्ण आढळल्याने कन्टेन्ट झोन करताना प्रशासन व ग्रामपंचायत ,आरोग्य अधिकार


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध