Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३० जून, २०२०
मनसेच्या पोरांनो डरकाळी फोडायची वेळ आली..!
मनसेची हजार चेष्टा झाली. मनसेला राजकीय भविष्य नाही, मनसेचे अस्तित्व संपले, असे पानभर लेख छापून आले. पण, मनसेच्या पोरांचं मनोधेर्य अजूनही खचल्याचं दिसत नाही. राज्यात मनसेसारखा धिंगाणा कोणत्याच पक्षानी घातला नाही, हे मान्यच करायला हवे. मनसेच्या अनेक मोठ्या नेत्यांनी पक्ष बदलले. आपला देव बदलला. पण, मनसेच्या पोरांच्या मनातला देव मात्र तसाच शाबूद राहिला. राज्यात भाजपची सत्ता आली, भाजप सत्तेतून गेल्यावर आघाडीची सत्ता आली. तरीही मनसेची पोरं डगमगली नाहीत. माझ्यासारखे भाजपचं कौतुक करणारे आता आघाडीचं कौतुक करु लागलेत. पण, मी भाजपचं कौतुक करत असताना मनसेचं कौतुक करणारी पोरं आज आघाडीचं सरकार येऊनही मनसेवरच ठाम आहेत, याचं कमाल कौतुक वाटतं.
मनसेचा एकमेव आमदार, सातच नगरसेवक, विकासाची ब्लू प्रिंट, लावरे तो व्हिडीओ, शॅडो मंत्रिमंडळ, बदललेला झेंडा, अशा अगणित गोष्टीतून मनसे ट्रोल झाला. प्रत्येकाने मनसेची खिल्ली उडवली. त्यामध्ये मीसुद्धा आहे. पण, आजही मनसेच्या पोरांची एकनिष्ठा पाहिली की बिघडलेल्या राजकारणाला वठणीवर आणणारी हीच खरी गँग आहे असं वाटतं. मनसे म्हणजे खळ खट्याक, मनसे म्हणजे राढा अशी या पक्षाची इमेज असली तरी मनसे म्हणजे कार्यकर्त्यांची निष्ठा हे समीकरणही आता अभिमानानं मिरवायला हवं. कारण स्वार्थासाठी बाप बदलणारी ही पोरं नाहीत, ही त्यांची निष्ठा दाखवून देते.
कोरोनानं राज्याची वाताहत झाली. काही ठिकाणी आघाडी फेल गेली तर काही ठिकाणी भाजपनं विखारी राजकारण केलं. लॉकडाऊन काढलं असलं तरी राज्य आजारी आहे. अशा परिस्थितीत मनसेच्या पोरांनी आता डरकाळी फोडायला हवी. परप्रांतीयाचा मुद्दा घेऊन या मनसेने संपुर्ण राज्य झोडपून काढलं होतं, त्याच मनसेनं बापाच्या नात्यानं या पिचलेल्या राज्याला मलमपट्टी करायला पुढं यायला हवं.
कारण आजवर मनसेच्या पोरांनी जो धिंगाणा घातलाय तसा धिंगाणा कोणत्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घातला नाही, हे विसरुन चालणार नाही.
पुनमचंद मोरे
धुळे जिल्हा उपाध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

आपल्यापर्यंत बातमी देण्यासाठी काय करावे लागेल
उत्तर द्याहटवा