Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ जून, २०२०
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र शासन तसेच दानशूर व्यक्तींना तरुण गर्जनाद्वारे केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद..!
महाराष्ट्र शासन तसेच दानशूर व्यक्तींना तरुण गर्जनाद्वारे केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद..!
परंडा (राहूल शिंदे )दि.23 तालुक्यातील चिंचपूर(बु) येथील श्री. राम लोहार यांची मुलगी कु.प्रांजली लोहार हिच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिला दि.29मे रोजी बार्शी येथील डॉ.पोकळे हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तिचे मोठेआतडे सडून फुटले असल्याचे निदान केले व
त्यावर शस्त्रक्रिया केली(बार्शी येथील वैद्यकीय खर्च 1.5लाख) परंतु तरीही तिच्या आरोग्यात सुधारणा झाली नाही.
आरोग्य स्थिती एकूणच गंभीर झाल्यामुळे तिला हडपसर, पुणे येथील लोटस हॉस्पिटल येथे हलवावे लागले. इथे पुन्हा त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. आयसीयू विभागात उपचार घेत होती,उपचारादरम्यान दि.14 रोजी तिची प्राणज्योत मालवली.पुणे येथील हॉस्पिटलमध्ये सर्व खर्च 5 लाख रुपये झाला आहे.
सदर लोहार कुटुंब हे हातावर पोट भरणारे अतिशय गरीब भूमिहीन कुटुंब,असून त्यांचे गावात छोटेसे वेल्डिंग चे दुकान व दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोलमजुरी करून ते त्यावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.त्यातच कोरोना संसर्गजन्य रोगामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे गेली चार महिने रोजगाराचे कोणतेच साधन उपलब्ध नव्हते.त्यामुळे एवढी रक्कम त्यांच्या आवाक्याबाहेरची होती.
तसेच,गावातील गावकरी मंडळींनी व नातेवाईकांनी आपापल्या परीने थोडीफार रक्कम हात उसने दिली. पोटाची मुलगी तर गेलीच परतू आज ना उद्या हात उसने घेतलेले पैसे परत करावे लागतील.याच चिंतेत कुटुंबीय आहेत.त्यांच्यासमोर कसे जगावे हा प्रश्न निर्माण झाला आहे .
यासाठी समजतील दानशूर व्यक्तीने पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे.व गरीब कुटुंबाला मोठ्या संकटातून वाचवण्यासाठी आपल्या आपल्या परीने हातभार लावणे गरजेचे आहे.
यासंदर्भात दि.15 जून रोजी तरुण गर्जनामध्ये वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते.यात शासनाला व दानशूर व्यक्तींना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते.महाराष्ट्र शासन व जिल्ह्यातील मोठ मोठ्या राजकीय नेत्यांनी कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही.चिंचपूर(बु) येथील योद्धा ग्रूपच्या माध्यमातून आर्थिक मदत गोळा केली जात आहे.कालपर्यंत 85000 रु रक्कम जमा झाली आहे.याद्वारे एका गरीब कुटुंबाला फुल ना फुलाची पाकळी मदत होईल.तरी आपणास कळकळीची विनंती आहे की त्यांना मदतीची खूप गरज आहे,आवश्यक ती मदत करून माणसातील माणुसकी दाखवणे गरजेचे आहे. तरी आणखीनही ज्या दानशूर व्यक्तींना मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी आपल्या इच्छा प्रमाणे मदत करावी.
मदत करण्यासाठी अकाउंट नंबर- 31505678074 (SBI sonari)
IFSC-SBIN0007158
फोन पे नंबर :-9623488001
नरेंद्र भागवत गायकवाड
भाऊ शंकर राम लोहार याचा संपर्क क्र.8308598698
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा