Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २८ जून, २०२०
आ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते गायकवाड यांचा सत्कार..!
परंडा दि.28 (राहूल शिंदे) तालुक्यातील चिंचपूर(बु) येथील विजय सुदाम गायकवाड यांची, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकूण 17 संवर्गातील 431 पदांसाठी 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेत उपमुख्यकार्यकारी अधिकारी पदी निवड झाली आहे.ते सध्य मुंबई मंत्रालयात सहाय्यक कक्षअधिकारी पदावर कार्यरत आहेत.
सामन्य व गरीब कुटुंबातील मुलाच्या याअभूतपूर्व यशाबद्दल माजी जलसंधारणमंत्री तथा परंडा मतदारसंघाचे विद्यमान आ.प्रा.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते विजय गायकवाड कर्तव्यावर मुंबई येथे असल्याने त्यांच्यावतीने सत्कार स्वीकारण्यासाठी वडील सुदाम गायकवाड हे उपस्थितीत होते.
यावेळी जिल्ह्याचे खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उस्मानाबाद- कळंब मतदारसंघाचे आ.कैलास घाडगे-पाटील,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत,शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष गौतम लटके ,जिप चे कृषी व पशु संवर्धन सभापती दत्ता साळुंके ,माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल,आण्णासाहेब जाधव ,शिवाजी कासारे,समीर
पठाण,तहसिलदार अनिल कुमार हेळकर , गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ सयद , डॉ अबरार पठाण,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता मुंडे , पोलिस निरिक्षक इकबाल सय्यद, आदी यावेळी उपस्थित होते .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा