Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २ जुलै, २०२०

केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांचे रिक्त जागा पदोन्नतीने भरा. प्रहार शिक्षक संघटनेने केली आग्रही मागणी..!



परंडा दि.2 (राहूल शिंदे) केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांची रिक्त पदे पदोन्नतीने सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत यासंबंधी जि.प.उस्मानाबादचे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते,शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यात केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांची बरीच पदे रिक्त आहेत;सर्व प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा
उंचावणे,उपस्थितीतील सातत्य टिकवणे, सर्वांसाठी शिक्षणाचे योग्य नियोजन व्हावे यासाठी केंद्रीय शाळा स्थापन करण्यात आल्या तसेच या केंद्रीय शाळांसाठी पर्यवेक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र प्रमुख पदांची निर्मिती करण्यात आली.
मात्र सध्यस्थितीत केंद्र प्रमुखांच्या ५० टक्के पेक्षा जास्त जागा जिल्ह्यात रिक्त आहेत.त्याचा परिणाम शाळांचा पर्यवेक्षण व मार्गदर्शनावर होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
 
परंडा तालुक्यात तर फक्त दोनच केंद्रप्रमुखाची पदे भरलेली आहेत. उर्वरित ०८ जागा रिक्त आहेत. इतर तालुक्यातही अशीच काहीशी परिस्थिती आहे.

त्यामुळे केंद्रप्रमुखांची १०० टक्के पदे अभावितपणे भरण्यासाठी शिक्षण संचालक(प्राथमिक) दि.०२जून २०१४ च्या अधिसूचनेनुसार पदवीधारक (बी.ए.बी.एड) प्राथमिक शिक्षकांमधून सेवाज्येष्ठतेनुसार १००% पदोन्नतीने भरण्यात यावीत व जिल्ह्याच्या शाळा विकासासाठी व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गती द्यावी या न्याय मागणीचे निवेदन देते वेळी जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत, जिल्हा नेते संतुक कडमपल्ले, तालुका उपाध्यक्ष शहाजी झगडे आदि.पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध