Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २ जुलै, २०२०
राजस्थानहुन कर्नाटक जाणाऱ्या मालट्रकातून दहा लाखाचा मुद्देमाल जप्त…!
शिरपूर प्रतिनिधी :राजस्थान येथून मालट्रकाच्या टपावर अफुचे सुकलेले बोंडे ठेऊन कर्नाटक राज्याकडे जाणाऱ्या मालट्रक वर पोलिसांनी कारवाई करत २० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि १ रोजी शिरपूर तालुका पोलिसांना गुपीत माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलीसांनी मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर सेंधवाकडुन येणाऱ्या रस्त्यावर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या साहाय्याने नाकाबंदी लावून सापळा रचुन सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एम.पी ४४ एच ए ०५४७ क्रमांकाच्या ट्रक सांगवी कडुन येत असतांना त्या ट्रकला नाकाबंदी करून थांबवण्यात आले.
पोलिसांनी ट्रक चालकास विचारपूस केली असता ट्रकात काहीच नसल्याचे सांगण्यात आले तसेच कँबीनमध्ये देखील काहीही आक्षेपार्ह मिळुन आले नाही त्यामुळे पोलीसांनी ट्रकच्या टपावर जावुन तपासणी केली असता टपावर एक लोखंडी झाकन दिसुन आले.पोलिसांनी झाकन उचलून पाहिले असता बँबीन व ट्रॉलीच्या मध्ये एक छुप्पा कप्पा दिसुन आला.सदर पत्रा काढुन पाहणी केली असता तिथे काळ्या व पांढऱ्या रंगाच्या गोण्या दिसुन आले.
गोण्यांमध्ये पाहणी केली असता गोण्यांमध्ये अफुचे सुकलेले बोंडे(डोडा) हा अमली पदार्थ मिळुन आला.१०४.७०० किलो वजनाचे १० लाख ४७ हजार किंमतीचे अफुचे सुकलेले बोंड व २० लाख किंमतीचे मालट्रक जप्त करण्यात आला आहे. ट्रक चालक रघु कैन्हयलाल दायमा रा.दम्माखेडी,ता.सितामहुजि.मंदसोर याच्यावर शिरपूर तालुका पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा