Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ जुलै, २०२०
दिव्यांग हक्क अधिनियमाची अंमलबजावणी करण्याची मागणी..!
दिव्यांग हक्क अधिनियमाची अंमलबजावणी करण्याची मागणी
प्रहार अपंग क्रांती संस्था..! जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन..!
धुळे प्रतिनिधी:केंद्र शासनाचा दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ चे कलम ८९, ९२ अ आणि ९३ या कलमांची अंमलबजावणी करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती संस्थेने केली आहे़.
प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्षा इंदू क्षिरसागर, शहराध्यक्षा अॅड़ कविता पवार यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासन दिव्यांग हक्क अधिनियमात सुधारणा करण्याचा प्रयत्न होता़ परंतु प्रहार अपंग क्रांती संस्था व इतर संघटनांनी तीव्र विरोध केला़ त्यामुळे शासनाने कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मागे घेतला़ अपंग बांधवांच्या एकतेचा विजय झाला़.
असे असली तरी या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याचे दिसत नाही़ पोलीस विभागाला या अधिनियमाची पूरेशी माहिती नाही़.
त्यामुळे सर्व शासकीय विभागांची कार्यशाळा आयोजित करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा