Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ जुलै, २०२०

धुळे स्थानिक गुन्हे शाखे तर्फ प्रतिबंधीत विमल व सुगंधित पान मसाला सह एकूण ५०,०६,२३६/ रू. किंचा मुद्देमाल जप्त..!



धुळे सचिन वाफेकर:संपूर्ण भारत देशात कोरोना विषाणचे प्रादुर्भावाच्या पार्शवभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना धुळे जिल्ह्यात मागील काही दिवसापासून विनापरवाना व बेकायदा महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला सूगंधित पानमसालाची विक्री होत असल्याची चर्चा चालू असल्याने सदर बाबत माहिती काढून छापा कारवाई करावी बाबतचे आदेश मा. पोलीस अधीक्षक श्री.चिन्मय पंडीत व अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री. राजू भुजबळ यांनी स्थानिक गुन्हे शाखा, धुळे चे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत यांना दिले होते.

त्यावरून दिनांक- ०४/०७/२०२० रोजी पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत यांना गप्त बातमीदारामार्फ माहिती मिळाली की, आयशर क्र. एम.एच. ०४, जी.आर. ९६३२ मध्ये महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला सुगंधित विमल पानमसाला असून तो आयशर सद्या धुळे-मालेगाव रोडन जात असून तो रोकडोबा मंदिराजवळील विकास हॉटेल समोर उभा आहे. त्यावरून त्यांनी पथकास आदेशीत करून छापा व कारवाई करण्यास रवाना केले. त्यानुसार पथकाने आयशर क्र. एम.एच. ०४.जी.आर. ९६३२ ही चालक नामे मोहम्मद रशीद नेवासअली शहा, वय- ४२, व्यवसाय- चालक, रा. सोहरा माफी, बजहरा, ता. मेहदावल, जि. संतकबीरनगर, राज्य- उत्तरप्रदेश सह ताब्यात घेऊन तिची झडती घेता त्यामध्ये एकूण -४३,०६,२३६/- रू. किं. चा केसर युक्त विमल पान मसाला व तंबाखू मिळून आले. सदर पानमसाला व ७,००,०००/- रू. कि.ची आयशर असा एकूण ५०.०६.२३६/- रू. किंचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग, धुळे यांचे ताब्यात देण्याची कारवाई चालू आहे.

वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री. राजू भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. धुळे चे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांचे पथकातील हनुमान उगले, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, तुषार पारधी, मयुर पाटील व चा.पो.का. दिपक पाटील व वयु.आर.टी. पथकातील  रविंद्र बवनराब सांगळे,जयेश संजय मोरे, संदिप बाळकृष्ण पाटील ,विनोद पंडीत गांगुडे अशांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध