Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ६ जुलै, २०२०
कोरोना शेतकऱ्यांच्या मानगुटीवर,पेरणी तोंडावर असतानाही पीक कर्ज मिळेना..!
जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असून दमदार झालेल्या पावसामुळे शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी कामाला लागला आहे. पेरणीसाठी बि-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्जाची गरज आहे. परंतु, फागणे येथील शेतकरी अद्यापही पीक
कर्जापासून वंचित आहे,फागणे सेंट्रल बँक
ऑफ इंडिया शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे वारंवार फेरपटका मारून देखील पीक कर्जापासून शेतकरी त्रस्त झाले आहे, त्यामुळे शिवसेना उपतालुका प्रमुख विलास चौधरी यांनी बँक अधिकारी यांना धारेवर धरून पीक कर्ज तात्काळ देण्याची मागणी केली
राज्य सरकारकडून मिळालेले आदेश आणि बँकांचे नियम या गोंधळामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँक टाळाटाळ करीत आहेत.शिवाय शेतकऱ्यांना पीक विम्याचा देखील पुरेसा लाभ झालेला नाही. यामुळे खरिपाची पेरणी करावी तरी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.
तर फागणे येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेच्या निष्काळजी व हलगर्जी अधिकारी कर्मचाऱ्यामुळे शेतकरी पीक कर्जेपासून वंचित आहे.शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून देखील बँक अधिकारी कर्ज देन्यास टाळाटाळ करत आहे त्यामुळे फागणे शाखेच्या आवारात पीक कर्ज व पेशन घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी दिसून आली
कोरोना संकट चा बहाणा करून उडवाउडवीचे उत्तरे बँक कर्मचाऱ्याकडून देण्यात येत आहे.
त्यामुळे आज शिवसेना पक्षाचे उपतालुका प्रमुख विलास चौधरी यांनी आपल्या शिवसैनिकांसह बँक अधिकारी याना जाब विचारून चांगलेच धारेवर धरले,
पेरणीचा हंगाम सुरु असतानाही शेतकऱ्यांचे नुकसान डोळ्यासमोर दिसतानाही कागदपत्राची पूर्तता करून देखील शेतकरी पीक कर्जापासून अद्यापही का वंचित आहे? असा प्रश्न विलास चौधरी यांनी उपस्थित केला,
त्यांच्या समवेत यावेळी फागणे ग्रामपंचायत उपसरपंच युवराज सूर्यवंशी, सदस्य कैलास पाटील, हंसराज पाटील, विक्रम पाटील,
भास्कर पाटील शेतकरी भटू चौधरी, भाऊसाहेब पाटील, कृष्णा चौधरी, कैलास धनगर आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते,
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा