Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ जुलै, २०२०

जामनेर येथील साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा..!




जामनेर:प्रतिनिधी:संजय सूर्यवंशी: जामनेर येथील दुर्गा नगर मध्ये गुरु पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला.साई प्रतिष्ठान साई समिती व युवा शक्ति मित्र मंडळ यांच्यावतीने दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येत असतो. 

परंतु या वर्षी कोरोना या महामारी मुळे समितीने गुरुपौर्णिमा उत्सव हा थोडक्यात साजरा करण्याचे ठरविले म्हणून आज साईबाबा मंदिर दुर्गा नगर  येथे सकाळी साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक व आरती करून संध्याकाळी साईबाबांची पालखीची मिरवणूक काढण्यात आली. 

सदर पालखीची पूजा नाना कपडे यांनी सपत्नीक केली व उत्सवासाठी एकनाथ पवार,प्रशांत भोई ,भगवान भोई ,सोपान लोहार,संतोष सोनवणे,फकिरा मोरे,ईश्वर पवार,राजू जैन रघुनाथ सूर्यवंशी,रतन सूर्यवंशी, श्रीराम कापडे,अक्षय पवार,अमोल चौधरी,जगदीश मुद्दलकर,राजू भोई, इत्यादी साई सेवक व महिला मंडळ यांची उपस्थिती लाभली .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध