Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३१ जुलै, २०२०
दूध दरवाढी बाबत परंडा तालुक्यात आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत आंदोलन...!
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.31राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटाच्या काळात सर्व जनतेला वा-यावर सोडले आहे. जनतेला राज्य सरकारने काहीच मदत केली नाही, राज्यातील दुध उत्पादक शेतकरी ही अडचणीत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दुधाला सरसकट प्रती लिटर 5 रु. अनुदान व दुध भुकटी निर्यातीस अनुदान दिले गेले.
आता तर दुधाचे दर त्यावेळेपेक्षाही खालावलेले आहेत. मात्र राज्यातील नाकर्त्या सरकारने दुध दत्पादक शेतक-यांना ही वा-यावर सोडुन दिले आहे.
भाजपा-महायुतीच्या वतीने 21 जुलै ला परंडा तहसिलदार यांना दुध भेट देऊन 1 ऑगस्ट 2020 ला आंदोलनाचा इशारा दिला होता. शासनाचा दुध प्रश्नावर काहीच निर्णय न झाल्याने आम्ही दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11.30 वा. भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत तालुक्यातील परंडा येथे शिवाजी चौक, अनाळा येथील शिवाजी चौक व वारदवाडी येथील चौकात या तीन ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. परंडा येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, रिपाई (आ) प्रदेश सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ चौधरी, भाजपा तालुकाअध्यक्ष राजकुमार पाटील, रिपाई तालुकाध्यक्ष फकीरा सुरवसे, आकाश बनसोडे, रासप विधानसभा प्रमुख बप्पाजी काळे, तालुकाध्यक्ष शिवाजी माने व वारदवाडी येथे सुखदेव टोंपे, राहुल कारकर,अरविंद रगडे, शिवाजी पाटील, बाळु निकाळजे, तानाजी सोनवणे तसेच अनाळा येथे परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संतोष सुर्यवंशी, ॲड. गणेश खरसडे, रमेश पवार, अनिल पाटील, सतिश देवकर, निशिकांत क्षिरसागर, दादा सुरवसे, सागर रंदील यांच्या प्रमुख उपस्थितीत दुध उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावर अहिंसक पध्दतीने ‘महाएल्गार आंदोलन’होणार आहे.
तत्पुर्वी 1 ऑगस्ट रोजी सकाळी 7.00 वा. प्रत्येक दुध संकलन केंद्रावर गायीच्या दुधाला सरसकट प्रती लिटर 10 रु. अनुदान द्या, दुध भुकटी निर्यातीला प्रती किलो 50 रु. अनुदान द्या, दुध खरेदीचा दर प्रती लिटर 30 रु.करा यां प्रमुख मागण्यांचे व राज्यसरकाच्या धिक्काराचे फलक घेऊन आंदोलन करावे व 11.30 वा.तालुक्यातील दुध उत्पादक शेतक-यांनी मोठ्या संख्येने या रास्तारोको आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा युवा तालुकाध्यक्ष अनिल पाटील यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा